पत्रकार दिनाचे औचित्य साधत शहादा पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकारांचा सन्मान




पत्रकार दिनाचे औचित्य साधत शहादा पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकारांचा सन्मान 



शहादा
पत्रकार दिनाचे औचित्य साधत शहादा पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
    आद्य पत्रकार कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात येते या पार्श्वभूमीवर येथील पोलीस ठाण्यात पोलीस स्टेशनच्या माध्यमातून पत्रकार दिनाचे औचित्य साधत पत्रकारांचा पोलिसातर्फे सन्मान करण्यात आला. पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या हस्ते परिसरातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शहादा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल, जेष्ठ पत्रकार प्रा. डी.सी पाटील, संजय राजपूत, गिरधर मोरे, शहादा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. नेत्रदीपक कुवर, चंद्रकांत शिवदे, सलाउद्दीन लोहार, योगेश सावंत, हर्षल साळुंखे, मनोज बिरारी, सुमित गिरासे, दीपक वाघ आदी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने