वराकडे.ना शिक्षण ना शेती ना घर न बघता लावला पदवीधर मुलीचा विवाह ,
भडणे येथील खरकार परिवाराच्या कौतुकास्पद उपक्रमाला वऱ्हाडींनी दिली कौतुकाची थाप
प्रत्येक समाजात आज मुलगी मिळणे कठीण झाले आहे अशा परिस्थितीत कुठल्याही वधू पित्याला आपला जावई शोधण्यासाठी नोकरी बरोबर शेती तसेच उद्योग धंदा बघून मुलगी सुखी राहील या गोष्टी बघूनच मुलीच्या आई वडिलांचाआटापिटा असतो मात्र शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील आदर्श शेतकरी बापु सदा पाटील यांची एकुलती एक पदवीधर कन्या तर भडने दूध उत्पादक सोसायटीचे चेअरमन नाना पाटील यांची पुतनी वालखेडा येथील माजी जि प सदस्य छोटू पाटील यांची भाचीही अश्विनी पदवीधर असून देखील त्यांनी मुलाकडे ना शेती ना घर ना नोकरी न बघता आपला भाचा कल्पेश बघून आपली मुलगी देखील भाच्याला दिल्यानेआपल्या भाज्याकडे ना शेती ना घर ना शिक्षण असे नसताना देखील मुलगा चांगला संस्कारी निर्व्यसनी सुदृढ सांप्रदायिक वारकरी व व्यावसायिक असे गुण बघून दिल्याने आपल्या भाच्याला दिल्याने लग्न सोहळा समारंभात वधू पिता बापू पाटील व आई यांचा भडणेतील लोकनियुक्त सरपंच गिरीश पाटील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी माजी जि प सदस्य छोटू पाटील भडणे दुध उत्पादक सोसायटीचे चेअरमन बाळू पाटील रमेश पाटील प्रशांत माजी उपसरपंच यांच्या रावसाहेब निकम यांच्या हस्ते हस्ते शाल श्रीफळ देऊन वधु पित्याचा सत्कार करण्यात आला या भडणे येथील खरकार परीवाराचा समाजातील ईतरांना पुढे आदर्श निर्माण केला एवढे मात्र निश्चित
मुलाचे कल्पेशचे आई व वडील दोघे लहानपणीच पितृछत्र हरपले असताना लहानपणापासून सुरत येथे वास्तव्यास होता व तिथेच कामधंदा करून स्वतःच्या पायावर जिद्द चिकाटी मेहनतीच्या बळावर आपल्या कर्तुत्वावर उभा राहिला व कामानिमित्त तेथे शेटल झाला त्याच्याकडे ना शेती ना घर ना शालेय शिक्षण मात्र भाचा संस्कारी व पारमार्थिक निस्वार्थी उत्तम प्रकारे व्यवसायात भरारी घेऊन व्यावसायिक सुदृढ युवक बघून मामाने मुलगी दिली व भडणे येथे मुलीच्या वडिलांनी म धुमधडाक्यात लग्न लावून दिल्याबद्दल लग्न सोहळा चर्चेचा विषय ठरला व लग्नप्रसंगी जमलेले नातेवाईक गावकरी ईस्ट मित्रांनी वधूवराना कौतुकाची दिली,
