खान्देश मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मनोहर देवरे तर उपाध्यक्ष पदीसमाधान ठाकरे यांची बिनविरोध निवड.
दोडाईचा (अख्तर शाह)
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजनासह अध्यक्ष पदासह कार्यकारीणी निवड.
६ जानेवारी २०२४ रोजी सालाबादप्रमाणे एका वर्षासाठी खान्देश मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते मनोहर देवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली उपाध्यक्ष पदी समाधान ठाकरे तर सचिव पदी हेमंत मराठे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
शासकीय विश्रामगृहात दुपारी १२.०० वाजता,दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष जीवन भोई आणि जमलेल्या सर्व पत्रकार बांधवांच्या हस्ते झाले.
अध्यक्षपदासह इतर सदस्यांची ६ जानेवारी २०२४ ते ६ जानेवारी २०२५ पर्यंत ह्या एका वर्षासाठी निवड करण्यात आली आहे.ती निवड खालीलप्रमाणे अशी आहे.अध्यक्ष पदी श्री मनोहर देवरे, उपाध्यक्ष पदी-समाधान ठाकरे,सचिव पदी-हेमंत मराठे, सल्लागार पदी श्री दौलतराव सुर्यवंशी, सदाशिव भलकार, कैलास राजपूत, तर सदस्य पदी अख्तर शाह
अनिल सिसोदीया, प्रदीप जाधव, सुनिल धनगर, जीवन रामोळे,,दिनेश ठाकरे,विजय बागल, राजन मोरे अमृत पाटील, महेंद्र कोळी आदींचा समावेश आहे.
