शिरपूर पोलिसांच्या सतर्कतेने शेतकऱ्याची बैल जोडी अवघ्या काही तासात परत




शिरपूर पोलिसांच्या सतर्कतेने शेतकऱ्याची बैल जोडी अवघ्या काही तासात परत

शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतकऱ्याची बैल जोडी चोरी झाल्याच्या संशयावरून तक्रार करण्यासाठी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांनी प्रसंग अवधान दाखवून तात्काळ घटनास्थळी भेट दिली त्यामुळे पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंग अवधानामुळे शेतकऱ्याला आपली बैल जोडी परत मिळाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की होळनांथे तालुका शिरपूर येथील शेतकरी चंद्रकांत विजयसिंग राजपूत यांनी शेती कामासाठी मध्यप्रदेशातील खेतिया येथे एक बैल जोडी खरेदी केली होती भाड्याची गाडी करून शिरपूर पर्यंत आणली. शिरपूर येथील वाघाडी टी पॉइंट येथे स्वतःच्या गाडीत नेण्यासाठी त्यांनी बैल जोडीला दोराने गाडीला बांधले व जेवण करण्यासाठी हॉटेल आकाश गार्डन येथे गेले. जेवण करून परतल्यानंतर त्यांना आपली बैलजोडी जागेवर आढळून आली नाही. त्यांनी परिसरात भरपूर शोध घेतला असता ती मिळून आली नाही त्यामुळे अज्ञात इसमाने सदरची बैल जोडी चोरून नेल्याबाबत खात्री झाल्यानंतर त्यांनी दिनांक सात जानेवारी 2024 रोजी सकाळी दहा वाजता शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांची प्राथमिक तक्रार ऐकून घेतल्यानंतर तात्काळ   पोलीस उप निरीक्षक संदीप दरवडे, व पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे यांनी तात्काळ वाघाडी टि पॉइंट घटनास्थळ जवळ जाऊन पाहणी केली व आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेरा चा शोध घेतला. या परिसरात विचारपूस सुरू केली, या परिसरात चौकशी सुरू असतानाच एका इसमाने पोलिसांना सांगितले की आपण शोधत असलेली बैल जोडी ही आम्ही याच परिसरात बांधून ठेवली आहे. सदरची बैल जोडी ही दोरीची गाठ सुटल्याने शेतशिवाराकडे जात असताना आढळून आली मात्र त्यासोबत कोणीही इसम दिसून न आल्याने सदर बैल जोडी आम्ही बांधून ठेवली आहे. याबाबत कोणी विचारणा केली तर त्याला परत करू अशा उद्देशाने तिला सुरक्षित ठेवले असून ज्याची असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जावे . अशी माहिती दिल्यानंतर तात्काळ त्या बैल जोडीची ओळख पटवून ती फिर्यादी व  मूळ मालकांना  ओळख पटवून परत करण्यात आली.

शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस उप निरीक्षक संदीप दरवडे व संदीप मुरकुटे यांनी तात्काळ चौकशी केल्याने पीडित शेतकऱ्याला त्याची बैल जोडी मिळण्यास मदत झाली आहे. म्हणून फिर्यादी यांनी शहर पोलीस ठाण्याचे आभार व्यक्त केले आहेत. यावेळी फिर्यादी यांच्या डोळ्यात आनंद अश्रू पानवले होते. त्यामुळे तक्रार लिहून घेणे आधीच तात्काळ चौकशीचे सूत्र फिरवल्याने व पोलिसांनी सतर्कता दाखवल्याने पीडित शेतकऱ्यास फार मोठी मदत झाली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने