जिल्हाधिकारी धुळे यांच्या प्रमुख प्रमुख उपस्थितीत तापी नदी पात्रात नैसर्गिक आपत्ति संदर्भात मॉक ड्रिल
शिरपूर प्रतिनिधी - आज दिनांक 12 जानेवारी रोजी धुळे जिल्हाधिकारी माननीय अभिनय गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील
सावळदे ता शिरपुर येथील तापी नदी पात्रात नैसर्गिक आपत्ति संदर्भात मॉक ड्रिल घेण्यात आले. याप्रसंगी आपत्ती व्यवस्थापन कक्ष व धुळे जिल्हाधिकारी यांनी संकटकालीन परिस्थितीत येणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळेस आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या समोरच स्कुबा डायविंग प्रशिक्षण व प्रात्यक्षिक करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हाधिकारी अभिनव गोयल, उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे, तहसीलदार शिरपूर महेंद्र माळी, जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देवगावकर, एसबीआरएफचे डी वाय एस पी पारस्कर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर , नगरपरिषदेचे सीईओ तुषार नेरकर, इंडिया रेप चे इन्स्पेक्टर योगेश कुमार, रितेश कुमार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पावरा कृष्णा पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे, सहाय्यक गटविकास अधिकारी सुवर्णा पवार, परिवहन अधिकारी शेख, आरोग्य अधिकारी प्रसन्न कुलकर्णी व राष्ट्रपाल अहिरे, सरपंच अनिल महाजन उपसरपंच सचिन राजपूत, इत्यादी यावेळेस उपस्थित होते. मनोगत पोलीस पाटील जयपाल राजपूत यांनी केले, सूत्रसंचालन एम एल पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन उपसरपंच सचिन राजपूत यांनी व्यक्त केले.
