क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद प्राथमिक शाळा शिरपूर या ठिकाणी *मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा* या उपक्रमांतर्गत *माजी विद्यार्थी मेळावा*
शिरपूर - आज दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 9 शिरपूर* या ठिकाणी *मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा* या उपक्रमांतर्गत *माजी विद्यार्थी मेळावा* चे आयोजन करण्यात आले सदर मेळाव्यासाठी श्री धनराज जगन्नाथ माळी, श्री संतोष महारु माळी, श्री बिपिन रघुनाथ तेले, श्री युवराज पंडीत माळी, श्री प्रकाश हिरालाल देवरे सर हे माजी विद्यार्थी यांची उपस्थिती लाभली. सर्वांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यांनी वस्तू स्वरूपात शाळेसाठी खेळाचे साहित्य जसे लगोरी ,बॅडमिंटन सेट, टेनिस बॉल या वस्तू शाळेला भेट दिल्या .भारतीय संविधानाची उद्देशिका फ्रेम तसेच सरस्वती देवी प्रतिमा इत्यादी वस्तू शाळेला भेट स्वरूपात मिळाल्या शाळेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे शालेय परिवारातर्फे खूप खूप आभार व्यक्त करण्यात आले.
