दोन गावठी कट्टे व पाच जिवंत काडतुसासह आरोपी अटक करण्यात शिरपूर शहर पोलिसांना यश
शिरपूर प्रतिनिधी -शिरपूर शहर पोलीस स्टेशनच च्या पथकाने (दोन गावठी कट्टे व पाच जिवंत काडतुसासह एकुन 75,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल राजस्थान येथील एका आरोपीकडुन हस्तगत करण्याची कामगिरी केली आहे.
दि.31.12.2023 रोजी रात्री 19.00 वा. च्या सुमारास पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शिरपूर शहरात एस.टी. स्टैंड कडुन गुजराथी कॉम्प्लेक्सकडे एक इसम पायी चालत येत असुन त्याने अंगात विटकरी रंगाचा चौकटी शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पँट घातली आहे. त्याची दाढी वाढलेली आहे. त्याच्याकडे लाल रंगाची सॅक बैग आहे. त्या बॅगमधे गावठी बनावटीचा कट्टा (पिस्टल) आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांनी शिरपुर शहर पोलीसांचे एक पथक तयार करुन खात्री करुन कारवाई करणे बाबत कळविलेवरुन पोलीस पथकाने शिरपूर शहरातील गुजराथी कॉम्प्लेक्स येथे पंचासह सापळा लावला असता वरील वर्णनाचा इसम एस.टी. स्टैंड कडुन गुजराथी कॉम्प्लेक्सडे पायी चालत येत असताना दिसला त्यावेळी पोलीस पथकाने पंचासमक्ष छापा कारवाई करुन सदर इसमाचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रयागसींह देविसींग जोधा वय 27 वर्षे रा. भुरुजगड ता. फलसुंड जिल्हा जैसलमेर राज्य राजस्थान असे सांगीतले. त्याच्या बंगची तपासणी केली असता त्याचे बॅकमधे खालील वर्णनाचे दोन गावठी कट्टे, पाच जिवंत काडतुस व एक मोबाईल मिळुन आला. त्याचे ताब्यातून
01)50,000/- रुपये किमतीचे दोन गावठी बनावटीचे सिल्व्हर रंगाचे पिस्टल (गावठी कट्टे)
02)5,000/- रुपये किमतीचे पाच पिवळ्या रंगाचे जिवंत काडतुस
03)20,000/- रुपये एक विवो कंपनीचा आकाशी रंगाचा स्मार्ट फोन मोबाईल
75,000/- रुपये एकुण किंमत च्या मुद्देमाल मिळून आला आहे. त्यामुळे त्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. श्रीकांत धिवरे साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. किशोर काळे साहेब, मा. सहाय्यक पोलीस अधिक्षक ऋषीकेश रेड्डी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. अन्साराम आगकर, पो.उ.नि.गणेश कुटे, पो.उ.नि. संदिप मुरकुटे, पो.उ.नि. संदिप दरवडे, पो.ना. राजेंद्र रोकडे, पो.कॉ.दिपक खैरणार, पो.कॉ. विवेकानंदन जाधव, पो.कॉ. भुपेश गांगुर्डे व चा.पो.कॉ. विजय पाटील यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास पो.उ.नि. संदिप दरवडे हे करत आहेत.
