भावाला उसने पैसे दिले, परत मागितल्याने बहिणीला मारहाण, छळाला कंटाळून महिलेचे धक्कादायक कृत्य....... प्रतिनिधी दत्ता पारेकर




भावाला उसने पैसे दिले,
 परत मागितल्याने बहिणीला मारहाण, 
छळाला कंटाळून महिलेचे धक्कादायक कृत्य.......

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे: भावाला दिलेले पैसे मागितल्याने भावाने आणि त्याच्या पत्नीने बहिणीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. 
या छळाला कंटाळून बहिणीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. 
हा धक्कादायक प्रकार सहा डिसेंबर रोजी घडला असून, या प्रकरणी ३० डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
सुनीता ऊर्फ नीता रामेश्वर राठोड (३१, रा. ताथवडे) असे आत्महत्या केलेल्या बहिणीचे नाव आहे.


 या प्रकरणी सुनीता यांचे पती रामेश्वर राठोड यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनीता यांचा भाऊ संदीप श्यामराव चव्हाण आणि त्याच्या पत्नी
 (दोघे रा. ताथवडे) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
 फिर्यादी रामेश्वर आणि सुनीता यांना दोन मुलगे आहेत.
 दोघेही मजुरीचे काम करत होते. 
सुनीता यांनी भाऊ संदीप याला दोन लाख रुपये उसने दिले होते. 
पैसे परत मागण्यासाठी तीन डिसेंबर रोजी त्या भावाच्या घरी गेल्या होत्या.
 तिथे भावाच्या पत्नीने सुनीता यांना शिवीगाळ करून घरातून हाकलून दिले.
 त्यानंतर त्याच दिवशी रात्री उशिरा रामेश्वर यांच्या घरी येऊन संदीप याच्या पत्नीने सुनीता यांना मारहाण केली. चार डिसेंबर रोजी याबाबत त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 
पाच डिसेंबर रोजी सुनीता एका सोसायटीमध्ये घरकाम करण्यासाठी गेल्या होत्या. काम करून घरी परत येत असताना त्यांना भाऊ संदीप आणि त्याच्या पत्नीने अडवले.
 पोलिसात तक्रार केल्याच्या कारणावरून दोघांनी सुनीता यांना बेदम मारहाण करून ‘पैसे परत देणार नाही,
 काय करायचे ते कर’ 
अशी धमकी दिली; 
तसेच जीवे मारण्याचीदेखील धमकी दिली. 
याबाबत पुन्हा वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, सहा डिसेंबर रोजी सुनीता सकाळी सहा वाजता कामावर जाते असे सांगून घराबाहेर पडल्या. 
सकाळी दहा वाजता त्या ताथवडे येथे बेशुद्ध अवस्थेत त्यांच्या नातेवाइकांना दिसल्या. 
त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
मात्र, उपचार सुरू असताना दहा डिसेंबर रोजी मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. 
वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने