*सरस्वती विद्यालयात कायदेविषयक साक्षरता शिबिर संपन्न*



*सरस्वती विद्यालयात कायदेविषयक साक्षरता शिबिर संपन्न* 

 श्री हनुमान व्यायाम मंदिर ट्रस्ट संचलित सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय शिरपूर येथे, तालुका विधी सेवा समिती , शिरपूर तालुका वकील संघ व श्री हनुमान व्यायाम  मंदिर ट्रस्ट शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने, कॉमन मिनिमम प्रोग्राम अंतर्गत " *कायदेविषयक जनजागृती शिबिर* उत्साहात संपन्न झाले.
     कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमापूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश मा. आर. आर. भद्रे साहेब होते .  कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख वक्ते मा. श्री.अँड.वाय जे शिरसाठ साहेब, यांनी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना पोक्सो कायदा व समाजात जीवन जगताना घ्यावयाची काळजी, याची सविस्तर माहिती दिली.  त्यानंतर मा .श्री .एम वाय राणे साहेब ( सहाय्यक दिवाणी न्यायाधीश ) यांनी विद्यार्थ्यांना मूलभूत अधिकार याविषयी सविस्तर माहिती देऊन, विद्यार्थ्यांनी कोणत्याही चुकीच्या मार्गाला जाऊ नये याबाबत मार्गदर्शन केले. 
      त्यानंतर मा. श्री. पी. पी. जोशी साहेब ( सह. दिवाणी न्यायाधीश शिरपूर ) यांनी विद्यार्थिनींना जीवनात कोणतीही वाईट प्रसंग अथवा घटनेच्या सामना कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले. शेवटी अध्यक्षीय भाषणात मा. आर .आर.भद्रे साहेब ( दिवाणी न्यायाधीश शिरपूर ) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आपल्याला आपली कुवत क्षमता ओळखता आली पाहिजे. तसेच मोबाईलच्या वापरामुळे, आज बालकांवर विविध विपरीत व वाईट परिणाम होत असून , शारीरिक व मानसिक अडचणी निर्माण होत असल्याचे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांच्या मनातील न्यूनगंड दूर करून एक सुसंस्कृत व चांगले भावी नागरिक विद्यार्थ्यांमधून निर्माण करण्यासाठी शाळेबरोबरच पालक व समाजानेही प्रयत्न करावे. 
         तसेच ए व्ही भावसार व मा वाय बी ठोंबरे यांनीही विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले.कार्यक्रमासाठी मा .श्री. एस. के. महाजन ( अध्यक्ष वकील संघ शिरपूर ) मा. श्री .वाय.बी.ठोंबरे ( उपाध्यक्ष वकील संघ शिरपूर ) मा. श्री . ए. व्ही. भावसार  ( सहा. सरकारी अभियोग्यता शिरपूर ) मा. श्री. एन .ए. चव्हाण ( सचिव वकील संघ शिरपूर ) तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. दिलीप लोहार, उपाध्यक्ष अरविंद वैद्य , सदस्य राजेंद्र राजपूत हे मान्यवर उपस्थित होते .
     कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी प्रयत्न केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने