महाराष्ट्र पोलीस दलातील 5 पोलीस अधीक्षकांच्या बदल्या; पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील, बच्चन सिंग, श्रवण दत्त यांचा समावेश*




*महाराष्ट्र पोलीस दलातील 5 पोलीस अधीक्षकांच्या बदल्या; पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील, बच्चन सिंग, श्रवण दत्त यांचा समावेश*

महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या सोमवारी (दि.1 जानेवारी) बदली आणि पदस्थापनेचे आदेश महाराष्ट्र शासनाकडून काढण्यात आले आहेत. राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशाने शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट (Joint Secretary Venkatesh Bhat) यांनी याबाबचे आदेश काढले आहेत. (Maharashtra IPS Officer Transfer)

बदली करण्यात आलेल्या (Maharashtra IPS Officer Transfer) पोलीस अधिकाऱ्याचे नाव आणि कंसात कोठून कोठे
1 ) श्रवण दत्त IPS Shravan Dutt (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस अधीक्षक, नंदूरबार SP Nandurbar)
2) पी. आर. पाटील IPS PR Patil (पोलीस अधीक्षक नंदूरबार ते पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे (CID Pune)
3) अविनाश एम बरगळ IPS Avinash M Bargal (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती (CID Amravati)
4) बच्चन सिंग IPS Bachchan Singh (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस अधीक्षक, अकोला SP Akola)
5) चेतना शेखर तिडके Chetna Shekhar Tidke (पोलीस उपायुक्त, नागपूर शहर (DCP Nagpur City) ते अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई (Addl SP Ambajogai)
पोलीस अधीक्षक अकोला संदीप घुगे (IPS Sandeep Ghuge) यांची बदली करण्यात असून
त्याच्या बदलीने पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येतील. तसेच अपर पोलीस अधीक्षक,
अंबाजोगाई पंकज कुमावत (IPS Pankaj Kumawat)
यांच्या पदोन्नतीने सुधारित पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने