AOMSI व भारत सरकार मॅक्सिलोफेशियल आयोजित TRAUMA AWARNESS WEEK कार्यक्रम संपन्न*



*AOMSI व भारत सरकार मॅक्सिलोफेशियल आयोजित TRAUMA AWARNESS WEEK कार्यक्रम संपन्न* 


शिरपूर - आर.सी.पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खर्दे बु. येथे दिनांक 16 जानेवारी रोजी  TRAUMA AWARNESS WEEK कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य पी. व्ही .पाटील होते. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ROAD TRAFFIC ACCIDENT संदर्भात माहिती देण्यासाठी डॉक्टर शरणबसप्पा ज. (HOD ओरल एंड मैक्सिलोफ़ेशिल सर्जरी) यांच्या मार्गदर्शनाखाली
धुळे येथील ACPM दंत महाविद्यालय व् मैक्सीलोफ़ेशियल सर्जन- डॉक्टर राणा सरदार, डॉक्टर अभिजीत लांडे, डॉक्टर यश नवाली, यांनी विद्यार्थ्यांना रस्ते अपघात, सुरक्षा व मदत कार्य यासंदर्भात मोलाची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच विविध स्लाईड शोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रस्ते अपघात सुरक्षा यासंदर्भात माहिती दिली.
 विद्यालयाचे प्राचार्य पी .व्ही. पाटील यांनी विद्यार्थ्यांना सदर माहिती अतिशय उपयुक्त असून जास्तीत जास्त परिसरातील नागरिकांपर्यंत संदेश पोहोच करा असे सांगितले.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य पी .व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाय.डी.मिठभाकरे,अमोल सोनवणे,पी. एस .अटकळे, बी. एस. बडगुजर, श्रीमती मनीषा पाटील यांनी नियोजन केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने