असलोद ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराची व भ्रष्टाचाराची चौकशी करा, निवेदनात मागणी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे




असलोद ग्रामपंचायतीच्या  मनमानी कारभाराची व भ्रष्टाचाराची  चौकशी करा, निवेदनात मागणी

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे

शहादा:-
 तालुक्यातील असलोद ग्रामपंचायतीच्या व ग्रामसेवकाची मनमानी कारभाराची व भ्रष्टाचाराची सन २०२१ ते आजपर्यंतची चौकशी करून कायदेशीर स्वरूपाची कार्यवाही करावी अन्यथा 27 डिसेंबर पासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाच्या इशारा असलोद गावातील नागरिकांनी दिला असून याबाबत गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांना दिला आहे याबाबतचे निवेदन ही देण्यात आला आहे. सदर निवेदन माकपा शेतमजुर युनियनचे जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड तहसीलदार दीपक गिरासे जिल्हाधिकारी मनीषा खत्री आदींनाही निवेदन देऊन उपोषणाच्या इशारा दिला आहे

निवेदनातील मजकूर असा की
 ग्रामपंचायतीत सरपंच, ग्रामसेवक यांना वेळोवेळी लेखी,  स्वरूपात तक्रार दाखल केल्या त्यात आजपर्यंत न्याय मिळाला नाही.  संबंधीतांवर कार्यवाही न झाल्यास शहादा पंचायत समिती  कार्यलयावर दि 27/12/२०२३ पासून आमरण उपोषणास  बसणार असून या आमरण उपोषणाची जबाबदारी गटविकास अधिकारी व शासनाची राहील असेही निवेदनात  म्हटले आहे सदर उपोषणात सरपंच व ग्रामसेवक यांनी मनमानी कारभार करून पुढील भ्रष्टाचाराच्या कारभार केला आहे यात

असलोद ग्रामपंचायत मध्ये जे.बी.एस.पी. फाऊन्डेशन मार्फत झालेलं जे काम झालं आहेत. ते काम सेवाभावी स्वरूपाची दाखवून त्या कामाचे बिले ग्रामपंचायत असलोद यांनी अदा केली आहेत.

जे १४ वित्त व१५ वित्त विभागाचे व पेसा ५% निधीचे जे काम झाले ते गावातील लोकांच्या नावे पैसे टाकले आहेत त्या लोकांना काहीही माहिती नाही फक्त बँकेत चला सहया करा अश्या लोकांची व काही लोक दुसऱ्या ठिकाणी खाजगी कंपनी तसेच इतर राज्यात आहेत. त्यांच्या नावे पैसे काढून घेतले ही सुद्धा चौकशी करावी.

ग्रामपंचायतने नमुना नं. ८ वर फक्त १०० रूपये स्टॅम्पवर खरेदी दाखवून नावे करण्याचा अधिकार आहे का? याची चौकशी व्हावी.
 ज्यांना सुशिक्षित बेरोजगार म्हणून जागा दिल्या आहेत त्यांच्याकडून ग्रामपंचायत ने वसूली केली. मात्र काल परवा ग्रामपंचायतीने मनमानी कारभार करून अतिक्रमण काढून टाकले व आजपर्यंत बांधकाम करत आहेत ते त्यांनी ग्रामपंचायतीची परवानगी घेतली नाही तरी सुरू आहेत. याची ही चौकशी व्हावी.
 ग्रामपंचायतीने एकुण घरपट्टी, पाणीपट्टीचा ५% निधी कोठे व कसा खर्च झाला याची ही चौकशी करावी.

अपंग व्यक्तींना १५% निधी कोणत्या वर्षी दिले व किती दिले याची चौकशी व्हावी. गेल्या ३ ते ४ वर्षात अमरधाम, पाणी पुरवठा, स्वच्छता हे कामे सेवाभावी बी.एस.पी. फाऊंन्डेशन च्या मार्फत झाले मात्र प्रत्यक्षात ग्रामपंचायतीने बिले अदा केली आहेत. याची चौकशी व्हावी.

 असलोद ग्रामपंचायतीने सन २०२१ पासून ग्रामपंचायत सदस्य व त्याच्या परिवारातील व्यक्तींना शासनाच्या रोजगार हमी विहिर, गुरांचा गोठा, घरकूल, हया योजनेच्या लाभ दिला व घेतला आहे. याची सुद्धा सखोल चौकशी करावी.

 तसेच  माहिती अधिकार अंतर्गत ग्रामपंचायतीची माहिती मागणी केली होती तीही देण्यांचे टाळाटाळ सुरू आहे त्याची चौकशी करावी. ग्रामपंचायतीमध्ये काही सदस्य यांनी आपल्या व परिवाराच्या नावे ग्रामपंचायतची जागा किंवा निवासी घरे करून घेतली आहेत. ग्रामपंचायतीची जागा नावे केली असेल तर त्यावर आपल्या मार्फत चौकशी करून संबंधीतांवर कार्यवाही करावी.

ग्रामपंचायतीने जे अतिक्रमण निर्मुलन मोहिमेला आम्ही विरोध केला नाही मात्र १५०-२०० अतिक्रमण असतांना फक्त ४ ते ७ च लोकांचे का काढण्यात आले हा फक्त व्यक्तीदोषाने ही कार्यवाही झाली आहे. पक्के बांधकाम तोडतांना त्याला लागून दोन मजली बांधकाम सुरू आहे त्याला साधी नोटीस सुद्धा का दिली नाही? म्हणून हे सिद्ध होते की, सदर अतिक्रमण व्यक्तीटोषाने काढण्यात आले आहे. 

 सन २०२१ पासून सर्व विकास कामांची रेकार्ड प्रमाणे कार्यवाही न झाल्यास कार्यवाही होते तो पर्यंत प स कार्यालयावर आमरण उपोषण बसणार आहोत याची संपूर्ण जबाबदारी पंचायत समिती व शासनाची असेही गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे निवेदनावर राधेशाम दौलत मराठे दिनेश पाटील वेळू शामराव पाटील आदींच्या सह्या आहेत

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने