सारंगखेडा येथील श्री. दत्त जयंतीनिमित्त भरणाऱ्या यात्रौत्सवाच्या अनुषंगाने वाहतूक मार्गात बदल
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे
नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे दिनांक 21/12/2023 ते दिनांक 10/01/2024 या कालावधीत श्री. दत्त जयंतीनिमित्त एकमुखी दत्तप्रभु यांची यात्रा भरणार आहे. यात्रेदरम्यान श्री. दत्तप्रभुंचे दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी जिल्ह्यातून व गुजरात, मध्यप्रदेश राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात, त्याचप्रमाणे सदर यात्रेत घोडेबाजार व बेलबाजार मोठ्या प्रमाणात भरत असल्यामुळे घोडे व बेल यांची खदेरी विक्रीसाठी महाराष्ट्रात प्रसिध्द आहे.
अंकलेश्वर-ब-हाणपूर मार्गावरील अवजड वाहतुकीने रहदारी खोळंबली जाते. पर्यायाने त्याचा परिणाम सारंगखेडा येथे यात्रौत्सवासाठी आलेल्या भाविकांवर होत असतो, यात्रौत्सवाच्या कालावधीत मंदिरात व यात्रेत लहान मुले मुली, स्त्रिया, पुरुष, वयोवृध्द व्यक्ती तसेच बाहेर गावाहुन दुचाकी, चारचाकी वाहनांवर आलेल्या भाविकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो, त्याचप्रकारे मंदिराचे परिसरात विविध खेळण्यांचे दुकान, खाण्याचे हॉटेल, स्टॉल, मनोरंजनाचे पाळणे इतर दुकाने असतात. यात्रोत्सव दरम्यान आलेले भाविक त्यांची दुचाकी, चारचाकी मंदिराचे परिसरात लावल्यामुळे भाविकांची गैरसोय होवून त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. सारंगखेडा यात्रौत्सवादरम्यान शहादा-दोंडाईचा रस्त्यावर मोटार अपघात, अवजड वाहनांच्या कोंडीमुळे भाविकांमध्ये धक्का-बुक्की, चेंगराचेंगरी इत्यादी प्रकार टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे दिनांक 21/12/2023 ते दिनांक 10/01/2024 या कालावधीत श्री. दत्त जयंतीनिमित्त भणाऱ्या यात्रोत्सवाच्या कालावधीत ।) दोंडाईचाकडून शहादामार्ग गुजरातकडे जाणारी अवजड वाहने ही दोंडाईचा चौफुलीवरून नंदुरचार-प्रकाशामार्गे गुजरातकडे 2) गुजरात राज्याकडून अक्कलकुवा तळोदा मार्गे येणारी अवजड वाहने प्रकाशा पुलावरून नंदुरबारमार्गे दोंडाईचाकडे 3) शहादाकडून दोंडाईचाकडे जाणारी अवजड वाहने शहादा- अनरद बारी, शिरपूर मागे व धुळेकडून शहादाकडे जाणारी अवजड वाहने सोनगीर फाट्यावरुन शिरपूर येथून बडाळो अनरद बारीमार्गे शहादाकडे याप्रमाणे अवजड वाहनांच्या मागांत बदल करण्यात आलेला आहे.
तसेच यात्रोत्सवात येणाऱ्या भाविकांनी त्यांची वाहने मंदिर परिसरात रस्त्यांवर किंवा इतरत्र पार्किंग करु नये, तसे आढळून आल्यास सदर वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी. आर. पाटील यांनी केले आहे.
