आमोदे ग्रामपंचायत मध्ये सरपंच उपसरपंच यांच्या नियुक्ती जाहीर





आमोदे ग्रामपंचायत मध्ये सरपंच उपसरपंच यांच्या नियुक्ती जाहीर

शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यात यावर्षी झालेल्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडणूक प्रक्रिया संपलेल्या ग्रामपंचायतींच्या व मागील पंचवार्षिक बॉडीच्या कालावधी संपुष्टात आल्याने आज तालुक्यातील नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच यांनी आपला कार्यभार दि.18 डिसेंबर 2023 रोजी हाती घेतला आहे.

शिरपूर तालुक्यातील आमोदे ग्रामपंचायत मध्ये लोकनियुक्त निवडून आलेले सरपंच श्रीमती कल्पना आनंद भील यांनी आपला कार्यभार हाती घेतला आहे. यात उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. यात फक्त एक नामनिर्देशन पत्र आल्याने  उपसरपंच या पदावर सौ संगीताबाई रणजीतसिंह देशमुख यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. 

याप्रसंगी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक नरेश सोनवणे यांनी सदर प्रक्रिया पार पाडण्यात कार्यभार सांभाळला. यावेळी नवनवीन नियुक्त ग्रामपंचायत सदस्य राज देशमुख, वीरपाल राजपूत, सौ. माधुरी अंबालाल राजपूत, सौ.दिपाली पवार, सौ.सुनंदा पवार ,सौ संगीताबाई रणजीतसिंह देशमुख, विजय जाधव, अजय बैसाने, मनोज भील हे उपस्थित होते.

यावेळी ग्रामपंचायत सभागृहात रणजितसिंह देशमुख, जगदीश पाटील ,जगदीशनाना देशमुख, दरबारसिंह राजपूत ,यशपाल राजपूत यांच्यासह गावातील वरिष्ठ नागरिक , व गावकरी उपस्थित होते.

सदरची निवड प्रक्रिया पार केल्यानंतर नवनियुक्त सरपंच ,उपसरपंच व सदस्य यांचे स्वागत व सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

 सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने