भाजपा सोलापूर जिल्हा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी बनसिद्ध वडरे यांची निवड प्रतिनिधी दत्ता पारेकर



भाजपा सोलापूर जिल्हा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी  बनसिद्ध वडरे यांची निवड



प्रतिनिधी दत्ता पारेकर 


पुणे:दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोळकवठे-बंदलगीचे सुपुत्र श्री बनसिद्ध वडरे सर यांचे भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी  निवड करण्यात आले आहे. 

    गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून श्री बनसिद्ध वडरे यांची संपूर्ण  दक्षिण सोलापूर तालुक्यात ओळख आहे.. दक्षिण सोलापूर तालुक्याचे विद्यमान आमदार श्री सुभाष देशमुख यांचे निकटवर्तीय असणारे बनसिद्ध वडरे हे वेळोवेळी सुभाष बापूंच्या मार्गदर्शनाखाली समाजातील गोरगरीब गरजू शेतकरी शेतमजूर यांची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.. दक्षिण सोलापुरातील सर्वच गावामध्ये त्यांची एक वेगळीच प्रतिमा आमदार सुभाष देशमुख यांच्यामुळे निर्माण झाली आहे. तालुक्यातील अनेक प्रश्न बापूंच्या मार्गदर्शनाखाली मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणारे बनसिद्ध वडरे यांच्या कार्यामुळे आणि त्यांच्या एकानिस्थवृती मुळेच त्यांना हे पद मिळाल्याचे सर्वसान्यांचे सुर असून यापुढील काळात त्यांच्यावर मोठी जबाबदारी असल्याचे दिसून येते.

 येणाऱ्या काळातील निवडणुकीत एक धनगर समाजाचा चेहरा,अभ्यासू तसेच सर्वच स्तरावर आपली ओळख आपल्या कार्यातून  निर्माण करण्याचे त्यांचे असलेले हातखंडा यामुळे नक्कीच फायदा होणार आहे.
 दक्षिण सोलापूर तालुक्यातील धनगर समाजाचे एक युवा नेतृत्व म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिले जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक मंदिरे व मंदिराशी संबंधित पुजारी,वडियार या सर्वांना एका क्षत्रछायेखाली आणून सर्वच मंदिरांचा विकास आणि मंदिरासाठी विविध मार्गातून निधी उपलब्ध करण्याकरता कायम प्रयत्नशील असून आगामी काळात धनगर समाजाचा एक नेता म्हणून भारतीय जनता पार्टीच्या या मिळालेल्या पदामुळे त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत.

  भारतीय जनता पार्टीने एका सर्वसामान्य कार्यकर्त्यावर इतकी मोठी जबाबदारी सोपवली असून त्या जबाबदारीस पात्र राहून सर्वतोपरी कार्य आपल्या हातून करून दाखवून पक्षाचे नाव व माननीय आमदार सुभाष बापू देशमुख साहेब यांचे कार्य सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार श्री बनसिद्ध वडरे यांनी आपले मत व्यक्त करताना केली.

तालुक्याच्या सर्व स्तरातून त्यांच्यावर आज कौतुकाचा वर्षाव करताना पाहावयास मिळाले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने