लग्न मंडपात 44 वऱ्हाडींचा रक्तदानाचा अनोखा ‘आहेर’*




*लग्न मंडपात 44 वऱ्हाडींचा रक्तदानाचा अनोखा ‘आहेर’* 

 *चक्क लग्न मंडपात नवरदेव, नवरी अन् वऱ्हाडींनी लग्न केल्याचा अनोखा लग्न सोहळा  नंदुरबार जिल्हयातील  शहादा शहरात पार पडला असून संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे....*

 :-आरोग्य जागरूकता दृढ करणारा एक विवाह सोहळा शहादा शहरात पार पडला आहे. विवाहात येणाऱ्या वऱ्हाडींना रक्तदान बाबत जागरूकता निर्माण केल्याने त्यातील ४४ जणांनी रक्तदान करत अनोखा ‘आहेर’ नव दामपत्याचा नावे केला. नवरदेव आणि नवरिने लग्न मंडपातच रक्तदान करीत नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे. नवदामप्त्याच्या या आनोख्या लग्न सोहळ्याचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे...

 :- विज्ञाना मुळे कितीही क्रांती झाली असली, तरी, पृथ्वीतलावर अजूनही कृत्रिम रक्ताची निर्मिती शक्य झालेली नाही. त्यामुळे रक्तदान हाच एकमेव पर्याय आहे. तात्काळ रक्त पुरवठा झाला नाही तर एखादा रुग्णाचा जीव जाण्याची शक्यता असते. रक्तदान, सर्व श्रेष्ठ दान म्हटले जाते. मात्र सर्वदूर रक्ताचा तुटवडा निर्माण होत असल्याने सामाजिक संस्था, शासकीय व खाजगी रुग्णालय रक्त संकलन वाढीसाठी प्रयत्नशील आहेत. या प्रयत्नांत शहादा शहरातील एका विवाहाने योगदान दिले असून, वधू वरा सह ४४ वऱ्हाडीनी येथे रक्तदान केले आहे. रविवारी शहदा शहरात हा अनोखा विवाह सोहळा पार पडला. धडगाव येथील रघुनाथ निकवाडे यांचा मुलगा सागर निकवाडे व राधेश्याम मोरे यांची कन्या नेहा मोर यांचा विवाह सोहळा, रविवार रोजी शहादा शहरात पार पडला. या वेळी ‘वर, सागर’ याने रक्तदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्याच्या इच्छेनुसार वधू सह तिच्या पालकांनी आणि लग्नात सहभागी झालेल्या सर्व वऱ्हाडीनी संमती देत रक्तदान शिबिर पार पाडत अनोखा आहेर दिला आहे. नंदुरबार येथील जनकल्याण ब्लड बँकेच्या पथकाने हे रक्त संकलित केले.

 :- आकाश जैन , जनसंपर्क अधिकारी
जनकल्याण ब्लड बँक नंदुबार....

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने