मालपुर गावाचे भूमिपुत्र तथा गोमातेची सेवा करणारे दामोदर विठ्ठल माळी यांना आदर्श शेतकरी पुरस्कार.
मालपुर वार्ताहर प्रभाकर आडगाळे.
देगाव तालुका शिंदखेडा येथे यात्रेच्या निमित्ताने आदर्श शेतकऱ्याची निवडणूक करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष हवामान तज्ञ पंजाबराव ढग यांच्या प्रमुख उपस्थितीत आदर्श शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यात आला. त्यात मालपुरचे सुपुत्र तथा गोमातेचे रक्षक दामोदर विठ्ठल अहिरे माळी यांना दुसऱ्यांदा गौरवण्यात येत आहे. यापूर्वी त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते सुद्धा गौरवण्यात आले होते व पुरस्कार देण्यात आला होता. अशा आदर्श खऱ्या शेतकऱ्यांना सन्मान मिळणे हे एक कौतुकाची बाब आहे त्यांच्या या कौतुकाच्या थापा साठी खास करून मालपुर होऊन आलेले शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष उत्तमराव तावडे, जिल्हा संघटक संजय बागुल, तरुण नेतृत्व करणारे पांडुरंग सूर्यवंशी, परमेश्वर माळी, युवा नेतृत्व जयवंत पाटील, आदी मंडळी उपस्थित होते.
