गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्याचा प्रयत्न करणारे दोन ताब्यात, वाहनासह 2 लाख 90 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त..!! नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे




गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्याचा प्रयत्न करणारे दोन ताब्यात, वाहनासह 2 लाख 90 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त..!!

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थ मुक्त जिल्हा ( Drugs Free District) या संकल्पनेची सुरूवात करुन वर्षभरापासून नंदुरबार जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कारवाया सुरु आहेत. अंमली पदार्थ मुक्त झालेला नंदुरबार हा राज्यातील पहिला जिल्हा आहे, नंदुरबार जिल्हा भविष्यातही अंमली पदार्थ मुक्त राहिल यासाठी काटेकोरपणे लक्ष ठेवले जाईल. तसेच अंमली पदार्थाची लागवड, शेती, वाहतूक इत्यादींवर प्रभावी कारवाई करण्यासाठी ड्रोन व इतर तंत्रज्ञानाचा वापर देखील केला जाईल. अंमली पदार्थ विरोधी कारवायांमध्ये अजून वाढ करुन जिल्ह्यात कुठल्याही प्रकारच्या अंमली पदार्थाना थारा असणार नाही.

तसेच अंमली पदार्थाची लागवड करुन त्याची जोपासना करणे, अंमली पदार्थाची वाहतूक करणे, अंमली पदार्थ कब्जात बाळगणे, विक्री इत्यादींवर जास्तीत जास्त कारवाई करण्याच्या कडक सूचना नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी. आर. पाटील यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या. तसेच पोलीस ठाणे व जिल्हा स्तरावर विविध पथकांची निर्मिती करण्यात आली असून सदरची पथके अंमली पदार्थावर कारवाई करणेसाठी सतत विविध भागात फिरत असतात, त्याचप्रमाणे अंमली पदार्थाची चोरटी वाहतूक थांबविण्यासाठी व जंगल परिसरात लपवून अंमली पदार्थाचा साठा शोधून काढण्यासाठी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी अशा ठिकाणांचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेणेबाबत दिलेल्या सूचनांनुसार ड्रोनचा वापरही केला जात आहे.

दिनांक 18/12/2023 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शहादा पोलीस ठाणे हद्दीतील वडगांव ते तितरी दरम्यान रोडवर कपाशी पिकाचे शेताच्या बाजूला एक चारचाकी वाहन संशयास्पदरित्या बेवारस उभी आहे. सदरची माहितो त्यांनी शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बुधवंत यांना कळवून बातमीची खात्री करुन कारवाई करणेबाबत आदेश दिले.

शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बुधवंत यांनी पथकासह शहादा पोलीस ठाणे हद्दीतील बडगांव ते लितरी दरम्यान बेवारस स्थितीत उभ्या असलेल्या वाहनाची पाहणी केली असता वाहनाचे सर्व दरवाजे व डिक्को लॉक असल्याचे व वाहनाजवळ कोणीही दिसून येत नसल्याचे निदर्शनास आले. म्हणून शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बुधवंत यांनी वाहनाला असलोद दुरक्षेत्र येथे आणून मॅकेनिककडून वाहनाची डिक्की व दरवाजे उघडून पाहिले असता डिक्कोमध्ये दोन प्लॅस्टीक बॉक्स व साड्यांमध्ये बांधलेले दोन गाठोडे मिळून आले. त्यामध्ये 90 हजार 700 रुपये किमतीचा 08 किलो ।। ग्रॅम वजनाचा सुका गांजा सदृश्य अंमली पदार्थ मिळून आल्याने तो कायदेशीर प्रक्रिया करुन गुन्ह्याच्या पुढील तपासकामी जप्त करण्यात आला.

शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बुधवंत यांनी त्यांच्या पथकाला वाहन मालकाचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेणेबाबत आदेशीत केल्याने शहादा पोलीस ठाण्याच्या पथकाने वाहन

मालकाचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेतले, ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता ।) वसंत सुरेश पावरा वय-27 वर्षे रा, जाम ता. शहादा जि. नंदुरबार 2) प्रदीप चुनिलाल जाधव वय-22 वर्षे रा. वाघडे ता. शहादा जि. नंदुरबार असे सांगितले, त्यांना चारचाकी वाहन व वाहनामध्ये मिळून आलेला गांजा सदृष्य अंमली पदार्थाबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना विश्वासात घेवून अधिक विचारपूस केली असता त्यांनी तो गांजा विक्री करण्यासाठी घेवून जात असलेबाबत सविस्तर माहिती सांगितली.

शहादा पोलीस ठाण्याच्या पथकाने ।) वसंत सुरेश पावरा वय-27 वर्षे रा. जाम ता, शहादा जि. नंदुरबार 2) प्रदीप चुनिलाल जाधव वय-22 वर्षे रा. वाघडे ता. शहादा जि. नंदुरबार यांना ताब्यात घेवून 90 हजार 700 रुपये किमतीचा 08 किलो 11 ग्रॅम वजनाचा सुका गांजा सदृश्य अंमली पदार्थ व 2 लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन क्रमांक GJ-05 JK-6242 असा एकुण 2 लाख 90 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त केला आहे. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपीतांविरुध्द शहादा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 709/2023 गंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम-1985 कलम 8 (क), 20 (ब), 20 (2) (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बुधवंत, सहा. पोलीस निरीक्षक श्री. लक्ष्मण चव्हाण, सहा. पोलीस उप निरीक्षक श्री. प्रदीप राजपुत, पोलीस हवालदार अशोक कोळी, पोलीस नाईक घनश्याम सुर्यवंशी, योगेश थोरात, संदीप लांडगे, पोलीस अंमलदार राकेश मोरे, भरत उगले, मिथून शिसोदे यांचे पथकाने केली असुन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने