संपूर्ण भारतभर सायकल प्रवास करत पर्यटन
नांदेड येथील युवक शिवाजी पाटील करीत दोन वर्षापासून सायकल प्रवास
आतापर्यंत झाला सुमारे ४५००० किमी सायकल प्रवास
दोंडाईचा (अख्तर शाह)
दोंडाईचा - "तेरा तुझको अर्पण" हा संकल्प घेऊन नादेंड जिल्हयातील मुखेड तालुक्यातील मुक्रामाबाद येथील सायकालिस्ट शिवाजी पुंडलीकराव पाटील हे अवलिया सायकलिस्ट पाटील हे त्यांच्या गावाहून एकटेच दि.१५ नोव्हेंबर २०२१ ला संपूर्ण भारत पर्यटन करिता निघाले व महाराष्ट्र प्रवास करत पश्चिम भारत, उत्तर भारत, पूर्व भारत, दक्षिण भारत व मध्य भारत फिरत २८ राज्य व ६ केंद्रशासित प्रदेश पर्यटन करत सोबतच त्या भागातील समाज जीवनाचा आणि भौगोलिक घटकांचा आढावा घेत, चालिरीतींचा अभ्यास करत सायकलवरच संपूर्ण देशात खेड्यामधून पर्यटन करत भारतातील चारही धाम, बारा ज्योतिर्लिंग, सर्व शक्ती पीठे, काशी, हिमालय, लेह- लडाख, भारताच्या सर्व बॉर्डर, समुद्र किनारे असे सर्व सुमारे ४५०००/- किमी सायकल प्रवास करत दोन वर्षांनंतर घराकडे परतीच्या प्रवासाला चालेले असून दोंडाईचा येथे आले असता दोंडाईचा सायकलिस्ट व नगरपालिका पर्यावरण दुत राजन मोरे यांनी स्वागत सत्कार केला. रात्रभर दोंडाईचा येथे थांबून सर्व माहिती सांगितली व पहाटे पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्यात, पाटील हे दोंडाईचा येथून चाळीसगाव, नाशिक, पुणे, करत आपल्या गावाकडे जाणार आहेत.
