आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी इंदापूर तालुका बंद प्रतिनिधी दत्ता पारेकर




आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी इंदापूर तालुका बंद 

प्रतिनिधी दत्ता पारेकर

 पुणे :शनिवारी इंदापूर तालुक्यात झालेल्या ओबीसी एल्गार मोर्चाची  जोरदार सभा पार पडल्यानंतर , दीपक काटे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असणाऱ्या दूध दर आंदोलन भेट देण्यासाठी चालत जात असताना. आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर मराठा समाजातील काही आंदोलकांनी चप्पल फेकीचा  प्रकार केल्यानंतर महाराष्ट्रतील ओबीसी समाज व गोपीचंद पडळकर समर्थक प्रचंड आक्रमक झाले . 

   चप्पल फेक करणाऱ्यावर त्वरित गुन्हे दाखल करा या मागणीसाठी त्यांनी रास्तारोको केला . इंदापूर पोलिस स्टेशनमध्ये याच मागणीसाठी निवेदन देण्यात आले. या हल्याच्या निषेधार्थ सोमवार दिनांक 11 /12 /2023  रोजी संपूर्ण इंदापूर तालुका बंद राहील.  असे या निवेदनाद्वारे म्हटले आहे निवेदन देतेवेळी ओबीसी व धनगर तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने