*सुखदेवसिंग गोगामेडींच्या अस्थिचे तापी नदीत विसर्जन, नंदुरबारात नागरिकांनी घेतले दर्शन*
राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेवसिंग गोगामेडी पांच्या अस्पिकतश नंदुरबारला आत्यानंतर राजपूत समाजबांधवांसह हिंदूप्रेमींनी अस्थिकलश दर्शन घेतले. यावेळी सामुहीक श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर दक्षिणकाशी प्रकाशा येथील तापी नदी पात्रात सुखदेवसिंग गोगामेडी यांच्या अस्थिचे विधीवत पूजन करुन विसर्जन करण्यात आले. राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे
राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेवसिंग गोगामेडी यांचे अस्थिकलश दर्शनासाठी गोगामेडी गावाहून धुळे व नंदूरबार जिल्ह्यात आणण्यात आहे. धुळे जिल्ह्यातील सावळदा, मेथी, चिमठाणे, कामपूर, दोडाईचा मार्गे सुखदेवसिंग गोगामेडी यांचे अस्थिकलश नंदूरबारला आले. नंदूरबार शहरातील धुळे चीकूठीवर राजपूत समाजबांधवांनी सुखदेवसिंग गोगामेडी यांचे अस्थिकलश आत्यानंतर शहरातीत अमर सिनेमा चौक जवळ श्रद्धांजली कार्यक्रमाच्या ठिकाणी आणले. दुपारी ४ वाजेच्या दरम्यान अस्थिकलश आल्याने समाज बांधवांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले. पावेळी समस्त राजपूत समाज बांधवांसह हिंदू बांधव यांनी उपस्थित राहून सुखदेवसिंग गोगामेडी यांच्या अस्थिचे दर्शन घेतल्यानंतर सामुहीक श्रद्धांजली अर्पण केली. तसेच गोगामेडी यांच्या अस्थिकलशजवळ पुष्पांजली अर्पण केही गावेळी उपस्थित मान्यवरांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सुखदेवसिंग गोगामेडी पांचे अस्थिकलश नंदुरबारडून राकसवाडे, कोळदा येथे गेल्यान त्या ठिकाणीही समाज बांधवांनी दर्शन घेतले. तसेच प्रकाशा येथील तापी नदी पात्रात सुखदेवसिंग गोगामेडी यांचे अस्थिचे विधीवत विसर्जन करण्यात आले. दरम्यान, सावळदे शिंदखेडा, मेथी, कानपूर, विखरण, दोडाईचा, धावडे, खोक्राळे, शनिमांडळ,वावद येथेही सुखदेवसिंग गोगामेडी याच्या अस्थिकलश समाजबांधवांनी पुष्पार्पण करून दर्शन घेतले.
