आमोदे येथे खासदार हिनाताई गावित यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील मंदिरांचे गाव अशी एक नवीन आध्यात्मिक ओळख निर्माण करणाऱ्या आमोदे गावात रविवार दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी खा. हिनाताई गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या शुभ हस्ते गावातील विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
आमोदे गावाच्या विकासासाठी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर अमरीश भाई पटेल, आदिवासी विकास मंत्री नामदार विजयकुमार गावित,
खासदार हिनाताई गावित, आमदार काशिरामजी पावरा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, माझी तालुका अध्यक्ष राहुल रंधे , ठाणे ग्रामपंचायत उपसरपंच दीपक जमादार या सर्वांच्या मार्गदर्शनाने व प्रयत्नांनी आमोदे गावासाठी भरघोस असा शासकीय विकास निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
यामध्ये गावातील विकास कामांसाठी जवळपास दोन कोटी पन्नास लाख पेक्षा अधिकच्या निधी हा विकास कामांसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यातून पूर्णत्वास आलेल्या कामांच्या लोकार्पण सोहळा व नवीन मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला.
शासनाच्या विविध योजना अंतर्गत, ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण यंत्र बसवणे पेवर ब्लॉक बसवणे अंतर्गत गटार तयार करणे पर्यटन विकास योजनेअंतर्गत गजानन महाराज मंदिर सोयी सुविधा करणे सारंग शहर महादेव मंदिर सोयी सुविधा करणे, शेतशिवारातील पानंद रस्ते, गावअंतर्गत काँक्रीटीकरण सामाजिक सभागृह वॉटर फिल्टर अशी अनेक विकास कामे ही नियोजित होते. यातून पूर्ण झालेल्या कामांच्या लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते ठेवण्यात आला होता.
या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाची प्रस्तावना राज देशमुख यांनी मांडली तर सूत्रसंचालन यशवंत नीकवाडे सर यांनी केले व आभार प्रदर्शन राज देशमुख यांनी केले.
या कार्यक्रमात बोलताना खासदार हिनाताई गावित यांनी जनतेला आश्वासन दिले की केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या मदतीने गावांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध असून यापुढेही विकास कामांना कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासणार नाही व आपण मागणी केलेली सर्व कामांना निधी मंजूर करून तालुक्याच्या विकासात भर घातली जाईल असे आश्वासित केले. शिवाय केंद्र शासनामार्फत नव्याने लागू झालेल्या घरकुल योजनेत देखील आपले नाव नोंदवून लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी खासदारांच्या हस्ते मंदिरात स्थापन होणाऱ्या भव्य अशा त्रिशुलाचे पूजन करण्यात आले. नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या देखील सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून खासदार हिनाताई गावित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, भाजपा माजी तालुकाध्यक्ष राहुल रंधे, थाळनेर गावाचे उपसरपंच दीपक जमादार, पंचायत समिती सदस्य येथे सोनवणे, ग्रामपंचायतचे लोकनियुक्त आजी आणि माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, व ग्रामस्थ यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत आमोदे, सरपंच हर्षाली रवींद्र देशमुख, उपसरपंच यशपाल राजपूत, रणजीत सिंह देशमुख, जगदीश नाना देशमुख , ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले .


