धुळे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश कार्यक्रम संपन्न दोंडाईचा (अख्तर शाह)




धुळे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात  प्रवेश कार्यक्रम संपन्न
दोंडाईचा (अख्तर शाह) 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.नामदार  अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात वंदनाताई केदार ग्रूप स्टेशन रोड, ज्ञानेश्वर माळी देवपुर ( ओबीसी ग्रूप ), झाकीर हुसैन व आर्शद अन्सारी ( शब्बीर नगर ग्रूप ), आरिश अन्सारी, अक्रम अन्सारी, वार्ड नं-१२ ( वडजाई रोड, ग्रूप ) आदी पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा.श्री.इर्शादभाई जहागिरीदार व शहराध्यक्ष मा.श्री.कैलासभाऊ चौधरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाची विचारधारा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व होवू घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पक्षप्रवेश निर्णायक भूमिका बजावतील, हा विश्वास आहे.
यावेळी  ओबीसी अध्यक्ष मा.श्री ज्ञानेश्वर माळी, कार्याध्यक्ष मा.श्री. शशीभाऊ खैरनार, उपाध्यक्ष मा.श्री उमेश महाजन, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष मा.श्री.अहिरे सर, विद्यार्थी अध्यक्ष मा.श्री.आकाश विभुते, विद्यार्थी प्रदेश सचिव मा.श्री. आयुष काकडे, युवक अध्यक्ष मा.श्री. कुणाल पवार, मा.श्री. समीर खान, मा.श्री सोहेल काझी, मा.श्री एजाज शेख, फरजाना शहा व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने