सुखदेवसिंग गोगामेडी यांचा अस्थिकलश आज शिरपूरात
*सावळदा येथे तापी नदीत होणार अस्थिचे विसर्जन*
शिरपूर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्याने गोगामेडी गावाहून त्यांचे अस्थिकलश शिरपूर येथे आज दि. १० डिसेंबर रोजी येत आहे. शिरपूर शहरात आज रविवार दुपारी ३ वाजता सुखदेवसिंग गोगामेडी यांचे अस्थिकलश दर्शनासाठी स्व चंदन आबा वाचनालय जवळ ठेवण्यात येणार आहे. 3:30 वा कलश मार्गस्थ व 4:00 वा अमोदा येथे दर्शन. यावेळी सामुहीक श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार असून तालुक्यातील राजपूत समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राजपूत समाज शिरपूर शहर व तालुका तर्फे करण्यात आले आहे.
राजस्थान राज्यातील जयपूर येथे राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेवसिंग गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गोगामेडी यांच्या मृत्यूची वार्ता कळताच राजपूत समाजात शोककळा पसरली होती. कारण सुखदेवसिंग गोगामेडी यांनी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या माध्यमातून देशभरात राजपूत समाजाचे मोठे संघटन उभे केले होते. गोगामेडी या गावी सुखदेवसिंग गोगामेडी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्काराच्या अस्थि गोगामेडी गावाहून दर्शनासाठी शिरपूर येथे आणण्यात आले आहे.
