जामन्यापाणी येथे किसान सभेची शाखा स्थापन




जामन्यापाणी येथे किसान सभेची शाखा स्थापन


शिरपूर  - महाराष्ट्र राज्य किसान सभेची जामन्यापाणी ता.शिरपूर जि धुळे येथे दि.9/12/20230रोजी  किसान सभेची स्थापना करण्यात आली. पियुबाई सरकार पावरा याची महिला  अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली त्या सह 11कार्यकर्त्याची कार्यकारिणी करण्यात आली.शाखेचे स्थापना फलकाचे उध्दघाटन महाराष्ट्र राज्य किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष अँड हिरालाल परदेशी यांचे हस्ते करण्यात आले.
सदरील शाखा स्थापनेचा सभेचे अध्यक्ष अँड. मदन परदेशी याच्या अध्यक्षतेखाली.सभेत काॅ.रामचंद्र पावरा यानी प्रास्ताविक भाषणात शाखेचे महत्व विषेद केले.नारसिग पावरा,शिलदार पावरा,अर्जुन कोळी,शिवाजीराव पाटील,अँड हिरालाल परदेशी यानी आपले मनोगत व्यक्त केले .
18/12/2023रोजी नागपूर येथे विधानभवनावर किसान सभेने वनजमीनीचे 7/12त्वरीत मिळावेत व इतर मागण्यांबाबत हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे.धुळे जिल्ह्य़ातील हजारो  किसान सभेचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. 
शिरपूर तालुक्यातील आदिवासी बांधवानी मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन केले.
स्थापन येथे शाखा स्थापन केल्यानंतर हि दुसरी शाखा स्थापन करण्यात आली.अशा 50 शाखा स्थापन करण्याचा संकल्प सर्व पदाधिकारी यांनी केलेला आहे.
सभेचे सुत्र संचलन भरत सोनार यानी केले.अँड सचिन थोरात यानी क्रांतिकारी गिताने कार्यक्रमास सुरुवात  केली.हरचंद पावरा यानी सर्वाचे आभार मानले.दगा जाधव , बापु गंभीर यानी कार्यक्रम साठी उत्तम व्यवस्था केलेली होती
सदरचा शाखा स्थापनेचा कार्यक्रमास मोठ्या संख्येत महिला व पुरुष हजर होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने