आदिवासी युवकांसाठी भरती पूर्व मार्गदर्शन शिबीर
पोलीस अधीक्षक धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचा उपक्रम
शिरपूर - शिरपूर तालुक्यात शिरपूर तालुका पोलीस स्टेशन सांगवी यांनी परिसरातील आदिवासी युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारा उपक्रम राबवला असून आदिवासी युवकांसाठी भरती पूर्व मार्गदर्शन शिबीर दि. ०९/१२/२०२३ रोजी श्रीकांत धीवरे पोलीस अधीक्षक धुळे, यांच्या संकल्पनेतुन व मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुका पोलीस स्टेशन येथे घेण्यात आले,
यामध्ये आदिवासी भागातील होतकरु उमेदवार भरती पात्र युवक युवतींनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला असुन या शिबीरामध्ये मा पोलीस अधीक्षक साहेब यांनी तरुणांना करिअरच्या अनेक संधी असलेबाबत तसेच अभ्यास कसा करावा? मैदानी सराव कसा करावा?
याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले, त्यांनतर श्री. राऊळ भाऊसाहेब यांनी पोलीस भरतीसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, पोलीस भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता, शारीरीक चाचणीसाठी पात्रता त्यात उंची, छाती न फुगवता, छाती फुगवुन किती लागते, तसेच धरणग्रस्त, माजी सैनिक, महिला उमेदवार, खेळाडू यांच्यासाठी काय काय सवलती आहेत बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक श्री. कोटुळे यांनी लेखी परीक्षेतील अभ्यासक्रम, कोण कोणत्या विषयाला, घटकांना किती मार्क आहेत, तसेच पोलीस भरती अभ्यासक्रम संदर्भात बाजारात कोण कोणती पुस्तके उपलब्ध आहे. अभ्यासाचे नियोजन कसे करावे? पेपरमध्ये कोण कोणत्या स्वरुपाचे प्रश्न येतात, अभ्यास कसा करावा? याबाबत मार्गदर्शन केले, त्यानंतर राखीव पोलीस निरीक्षक श्री. माहुले यांनी मैदानी चाचणी कशी द्यायची याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी प्रात्यक्षीक देखील करुन दाखविले, 'भरती दरम्यान मैदानी चाचणी होत असतांना सुचनांकडे बारीक लक्ष देणे आवश्यक आहे. सराव करत असतांना कोण कोणत्या गोष्टीकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे, मैदानी परीक्षेचा सरावा दरम्यान कोणत्या प्रकाराचा आहार घ्यावा, व्यायाम कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर पोलीस स्टेशनच्या मैदानावर उमेदवारांना पोलीस भरतीचे गटा गटांमध्ये गोळा फेक, १०० मीटर धावणे, ८०० मीटर धावणे, १६०० मीटर धावण्याचे प्रात्यक्षीक करुन दाखविले, तसेच त्यांच्या शंकांचे निरसन केले.
धुळे जिल्हयात मा पोलीस अधीक्षक सो यांनी प्रथमच आदिवासी भागामध्ये त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अश्या प्रकारचे पोलीस भरती पूर्व शिबीर राबविले असुन त्याचा भविष्यात शेकडो विदयाथ्यांना निश्चीतच फायदा होणार असून भविष्यात देखील जिल्हयात अशा प्रकारचे शिबीर इतर आदिवासी पटटयांमध्ये जेथे दळणवळण सुविधा नसुन व जे मुख्य प्रवाहापासुन दुर आहे अशा घटकांनमध्ये राबविण्याचा संकल्प मा. पोलीस अधीक्षक साहेब यांनी व्यक्त केला आहे.
या शिबीराला मा. श्री. श्रीकांत धीवरे साहेब, पोलीस अधीक्षक धुळे, पोलीस निरीक्षक श्री. आगरकर, राखीव पोलीस निरीक्षक श्री. माहुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुरेश शिरसांठ, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दिपक पावरा, पोलीस उपनिरीक्षक श्री. कोटुळे, शिरपुर तालुका पोलीस स्टेशनचे दुय्यम अधिकारी व पोलीस स्टाफ असे उपस्थित होते. शिवीराला पोलीस भरतीची तयारी करणारे युवक युवती व इतर ग्रामस्थ यांनी त्यांचा लक्षणीय सहभाग नोंदविला.

