रोटरी स्कूलमध्ये केनेडाचे रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रिचर्ड डेंटन यांच्या प्रमुख उपस्थितीत वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न* दोंडाईचा (अख्तर शाह




*रोटरी स्कूलमध्ये केनेडाचे रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रिचर्ड डेंटन यांच्या प्रमुख उपस्थितीत वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न*

दोंडाईचा (अख्तर शाह) दोंडाईचा येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये केनेडाचे रोटरी डिस्ट्रिक्ट 7010 चे गव्हर्नर श्री रिचर्ड डेन्टन, सौ. एलिझाबेथ डेन्टन,भरुचचे सेंटनिअल डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. अशोक कापडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत वार्षिक क्रीडा महोत्सव साजरा झाला. यावेळी कार्यक्रमाचे उद्‌घाटक म्हणून दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री विलास ताटीकोंडलकर,तर मान्यवर म्हणून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्री श्रीकांत इंदाणी, डॉ. दिनेश बैसाणे, संस्थाध्यक्ष श्री हिमांशु शाह, उपाध्यक्ष डॉ. मुकुंद सोहोनी, संचालक श्री पी.सी शिंदे श्री हैदरभाई नुराणी,श्री माणिकभाई चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी श्री डी. एस. सोनवणे,प्राचार्य श्री श्रुतिरंजन बारिक, रोटरी क्लब दोंडाईचाचे अध्यक्ष श्री गुलामरसुल शेख, सेक्रेटरी सतिश पाटील, सौ. सारिका इंदाणी,रो. डॉ. सुभाष फुलंब्रीकर,रो. राकेश जयस्वाल,रो. हर्षित पटेल पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सौ. योगिता कागणे  पालक-शिक्षक संघाचे सदस्य व मोठया प्रमाणात पालकवर्ग  उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे हस्ते सरस्वती पूजन व श्रीमती मंदाकिनीताई टोणगांवकर यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
      विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकासातला महत्त्वाचा घटक खेळ असल्याने शाळेत गेले 3 दिवस  कबड्डी, खो-खो, हँडबॉल, फुटबॉल,उंच उडी, लांब उडी, संगीत खुर्ची, बुक बॅलन्सिंग, रस्सीखेच, गोळाफेक, थाळीफेक, 100 मीटर धावणे, रिले अशा विविध क्रीडास्पर्धा ब्लू हाऊस, ग्रीन हाऊस, यलो हाऊस, रेड हाऊस अशा स्वतंत्र हाऊसनुसार वैयक्तिक व संघनिहाय स्पर्धा घेण्यात आल्या. या  खेळांत ब्लू हाऊसने प्रथम क्रमांक तर रेड हाऊसने द्वितीय क्रमांक मिळवला. प्रत्येक संघाने चुरशीच्या खेळात आपले कौशल्य दाखवून विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी विद्यार्थ्यांनी क्रीडेचे महत्त्व पटवून देणारे नृत्य सादर केले. उपस्थित पालक व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. विजेत्यांना मान्यवर, पालक-शिक्षक संघाचे सदस्य व पालकांच्या हस्ते पदक, चषक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
    प्रास्ताविकात प्राचार्य श्रुतिरंजन बारिक यांनी विद्यार्थ्यांनी शाळेचा  शैक्षणिक दर्जा टिकवला असून राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा  स्पर्धेतही चमकदार कामगिरी करून यश संपादन केले असल्याचे सांगितले.
    उद्घाटक श्री विलास ताटीकोंडलकर यांनी विद्यार्थ्यांच्या खेळातील शिस्त, संघभावना,सहकार्यभावना,व संचलनाचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी करिअरच्या दृष्टीने खेळाकडे पाहावे. एखादया खेळात पारंगत होऊन खेळाडूंसाठी राखीव असणाऱ्या सरकारी नोकरीच्या संधीचा फायदा घ्यावा. असे मोलाचे मार्गदर्शन केले.
    श्री रिचर्ड डेंटन यांनी शाळेच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील प्रगतीच्या प्रवासाची माहिती जाणून घेतली. शाळेच्या विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, शिक्षकदालन, कला व संगीत, क्रीडा, लायब्ररी किऑक्स, थ्रीडी क्लासरूम, ग्रंथालय, वाचनालय या अत्याधुनिक सुविधायुक्त विभागांची व सर्व डिजिटल क्लासरुमची पाहणी केल्यानंतर समाधान व्यक्त केले व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सातत्य टिकविण्यासाठी रोटरीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरून सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक प्रशांत जाधव,क्रीडा शिक्षक अजय हजारे, जितेंद्र भदाणे, विकास बाटुंगे, जाफर मिर्झा, गोपाल ढोले, धनंजय शिंदे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन किर्ती शाह यांनी केले,तर आभार सुवर्णा महाजन  मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने