दोडाईचा येथे वंजारी समाजाच्या वतीने लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांची जयंती साजरी
दोंडाईचा (अख्तर शाह)
दोंडाईचा : स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांची 74 वी जयंती दोंडाईचा शहर वंजारी समाजाच्या वतीने वंजारी भवन येथे साजरी करण्यात आली. याप्रसंगी स्व गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी वंजारी समाजाचे उपाध्यक्ष राहुल आव्हाड , माजी उपनगराध्यक्ष प्रदीप कागणे , डॉ. हेमंत नागरे ,नरेंद्रनाना भाबड , दीपक नागरे, शैलेश नागरे, संतोष उगलमुगले, अजय सानप, नितीन आव्हाड ,समीर आव्हाड ,दीपक नागरे,पंकज कागणे,अनिकेत आव्हाड, संदीप काकडे ,दिलीप काकडे, दगडू काकडे, चेतन कागणे, दीपक शेळके, बबलू मानकर आदी समाज बांधव उपस्थित होते.
