वृक्षमित्र शिवाजी राजपूत यांना लंडन बुक ऑफ रेकॉर्ड पुरस्कार




वृक्षमित्र शिवाजी राजपूत यांना लंडन बुक ऑफ रेकॉर्ड पुरस्कार

शिरपूर  - शिरपूर तालुक्यातील सुपरिचित व्यक्तिमत्व, आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित वृक्षमित्र शिवाजी राजपूत यांना आता नव्याने लंडन बुक ऑफ रेकॉर्ड पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

तालुक्यात कृषी, पर्यावरण, वृक्ष संवर्धन, वृक्ष लागवड बांबू लागवड यावर भरीव काम करणाऱ्या व खऱ्या अर्थाने पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्याचे अतुलनीय काम शिवाजी राजपूत करत आहेत. वृक्ष लागवड व पर्यावरण क्षेत्रात त्यांचे भरीव असे योगदान आहे. आजवर शेकडो एकर क्षेत्रावर बांबू लागवड करून तालुक्यातील सर्वसामान्यांपासून तर असामान्य व्यक्तिमत्त्वापर्यंत प्रत्येकाच्या वाढदिवशी स्वखर्चाने झाड लावण्याचा कार्यक्रम ते मागील दोन ते तीन वर्षांपासून राबवत आहेत. त्यांच्या या कार्याचे विविध सामाजिक सांस्कृतिक राजकीय संघटनांनी दखल घेतली आहे. आणि याबाबत त्यांना विविध पुरस्कार देऊन वारंवार सन्मानित केले आहे. आता शिरपूर तालुक्याच्या मानाच्या तुऱ्यात अजून एक पुरस्कार समाविष्ट झाला असून राजपूत यांना लंडन बुक ऑफ रेकॉर्ड पुरस्कार प्राप्त झाल्याने सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

निसर्गाप्रती असलेली ओढ, पर्यावरण संतुलतेची जाणीव तसेच " वृक्षवल्ली आम्हा सोयरे" या संत तुकाराम महाराज यांच्या संतवाणीला खर्या अर्थाने जपणारे शिरपूर येथील वृक्षमित्र शिवाजी राजपूत यांनी 17 महिन्यापासून दि. 01/07/2022 पासून ते आजच्या तारखेपर्यंत दि. 30 ऑक्टोबर पर्यंत 2900 लोकांचे वाढदिवस 510 बांबूचे रोप 880 प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लावून वाढदिवस साजरे करून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी हा एक विक्रम केला आहे आणि ह्या विक्रमाची नोंद लंडन बुक ऑफ रेकॉर्डन घेतली म्हणून त्यांना *लंडन ऑफ बुक अवार्ड मिळाला आहे. या अगोदर त्यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मिळाला होता.

शिवाजी राजपूत हे लोकांच्या आयुष्याबरोबर हजारो वृक्षांना जिवनदान देत आहेत. हेच वृक्ष हजारो लोकांचे आयुष्यमान वाढविणार आहे.* शिवाजी राजपूत यांची पर्यावरण क्षेत्रातील अतुलनिय कामाची दखल सर्व स्तरावर घेतली जात आहे. सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.

पर्यावरण दूत, निसर्ग प्रेमी, वृक्ष लागवडीच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्माण करून तालुक्यातील जनतेला नवीन संजीवनी देणाऱ्या  वृक्षमित्र शिवाजी राजपूत यांच्या कार्याचे वंदन करून त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल खूप खूप शुभेच्छा व हार्दिक अभिनंदन.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने