डॉ. प्रेमसिंग राजेंद्रसिंग गिरासे यांच्या खुन खटल्यातील दोन आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा
धुळे - दिनांक 06/09/2021 रोजी दुपारी 3.00 वाजेचे सुमारांस मयत प्रेमसिंग राजेंद्रसिंग गिरासे हा त्याची नुकतीच नविनच घेतलेली मोटर सायकल बजाज प्लॅटीना घेवून दराणे येथे घरी जात असतांना सोनगिर दोंडाईचा रोडवर चिमठाणा सबस्टेशन जवळ झालेल्या खुन खटल्यातील आरोपी शाम युवराज मोरे, व संदिप फुलचंद पवार या दोंघांना जिल्हा व सत्र न्यायधीश श्री. डॉ. एफ. ए. एम. ख्वाजा यांनी भा.द.वि. कलम 302 व 394 प्रमाणे प्रत्येकी दोन्ही कलमांमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावत ऐतिहासीक निकाल दिला. सदर खटल्यात सरकारी अभियोक्ता श्री. गणेश वाय. पाटील यांचा प्रभावीपणे युक्तीवाद ग्राहय धरण्यांत आला.
दि. 06/09/2021 रोजी दुपारी 3.00 वाजेचे सुमारास घटनेतील मयत प्रेमसिंग राजेंद्रसिंग गिरासे व त्यांचे सहकारी फिर्यादी जगदिश जयसिंग परमार व समाधान ईश्वरसिंग गिरासे यांचे सह शिंदखेडा येथुन नविन मोटार सायकल खरेदी करून दराणे येथे जात असतांना त्यांचे कडून मोटार सायकल चोरी करण्याच्या इरादयाने मयत प्रेमसिंग हे एकटा मोटार सायकलवर असल्याने त्याचा सोनगिर दोडाईचा रोडवर चिमठाणा सबस्टेशन जवळ चाकूने छातीवर व हृदयाजवळ तसेच उजव्या पायाच्या मांडीवर हल्ला करण्यांत येवून खुन करण्यांत आला होता व मोटार सायकल व मोबाईल चोरून नेला होता. तदनंतर प्रेमसिंग यांस दवाखान्यात काही लोकांनी नेले असता, मयत घोषीत करण्यांत आले होते. सदर घटनेचा तपास केला असता प्रेमसिंग याचा खुन आरोपी शाम युवराज मोरे, राकेश रोहिदास मोरे व संदिप फुलचंद पवार यांनी केल्याचे निश्पन्न झाले असून चोरी झालेली मोटार सायकल व मोबाईल आरोपी यांचेकडून हस्तगत करण्यात आला होता.
सदर घटनेची फिर्याद शिंदखेडा पोलीस स्टेशन गु. र.न. 135/2021 भा.द.वि. कलम 394, 302 अन्वये नोंदविण्यात आली असून घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुनिल बी भाबड यांनी केला व मा. न्यायालयांत दोषारोप पत्र दाखल करण्यांत आले. सदर खटला मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश - 1 यांचे न्यायलयात सुनावणी सुरू झाली. सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण 16 साक्षीदारांची महत्वपूर्ण साक्ष नोंदविण्यांत आली. त्यात जगदिश परमार फिर्यादी,दिपक बावीस्कर, बाळू धनगर, डॉ. साधना पाटील, समाधान गिरासे, मुकेश धनगर, योगेश दिलीपसिंग राजपूत, ईश्वर चव्हाण, निलेश पाटील, हंसराज चौधरी, आशिष भामरे जितेंद्र राजेंद्र पवार आणि सुनिल भाबड (पोलीस निरीक्षक) अशा साक्षीदारांचे महत्वपूर्ण जबाब नोंदविण्यांत आलेत. विशेष म्हणजे सदर खटल्यात कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हाता तथापी, साक्षीदार देवेंद्र विश्वासराव बोरसे व जगदिश विक्रम निकम या पंच साक्षीदारांसमक्ष दोन्ही आरोपींनी स्वखुशीने निवेदन देवून आरोपी शाम याने मयताची नविन मोटार सायकल जी दरोडा टाकून चोरून नेली होती व मयताचा खुन करण्यासाठी वापरलेला चाकू काढून दिले तसेच आरोपी संदिप याने मयताचा मोबाईल जो दरोडा टाकून चोरून नेला होता तो काढून दिला. त्याच प्रमाणे आरोपींच्या कपडयांवर रक्ताचे डाग मिळून आले तसेच आरोपी शाम याने काढून दिलेल्या चाकूवर असलेल्या मयताच्या रक्ताचे डाग व मयताचे रक्त हे एकच असल्याचे रासयनिक विश्लेषण अहवालात निष्पन्न झाले.
सदर खटल्यात सरकारपक्षातर्फे युक्तीवाद करतांना अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. श्री. गणेश वाय. पाटील, यांनी साक्षीदारांची साक्ष व इतर तपासण्यात आलेल्या साक्षीदारांची साक्ष तसेच अभिलेखा लेल रासायनिक विश्लेषणाचे अहवाल व आलेल्या पुराव्याच्या अनुषंग 2/3 न्यायालयाने दिलेल्या निकालांचा आधार घेत आरोपीना जन्मठेपेचीदण्या यावी असा युक्तीवाद केला.
सदर कामात मा. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. डॉ. एफ. ए. एम. ख्वाजा साहेब यांनी सदर खटल्यातील असलेल्या संपुर्ण पुराव्याचा व मा. सर्वोच्च न्यायालयाने, दिलेले निकालांचा सांगोपांग विचार करुन आरोपीस भा.द.वि. कलम 302 व 394 प्रमाणे प्रत्येकी दोन्ही कलमांमध्ये आरोपी शाम युवराज मोरे घटनेच्या वेळी वय - 26 वर्ष व संदिप फुलचंद पवार घटनेच्या वेळी वय - 25 वर्ष यांना दुहेरी जन्मठेपेची ऐतिहासीक शिक्षा तसेच दहा हजार रुपयाचा दंड व तो न भरल्यास सहा महिन्यांची सक्त मजूरीचा शिक्षेचा आदेश केला. तसेच मयताचे पालक यांना नियमानुसार जिल्हा विधी सेवा प्राधीकरण मार्फत पिडीत नुकसान भरपाई देणे बाबत आदेशित केलेले आहे. एकाच आरोपींना दोन वेगवेगळ्या कलमांखाली जन्मठेप ठोठावण्याची धुळे जिल्हातील ही पहिलीच शिक्षा आहे. यातील अन्य एक आरोपी राकेश रोहिदास मोरे यांस निर्दोष मुक्त केले.
सदर कामी फिर्यादी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅङ श्री. गणेश वाय. पाटील यांनी काम पाहिले. सदर खटला प्रकरणी मा. जिल्हा सरकारी वकील श्री. देवेंद्रसिंह योगेंद्रसिंह तवर यांनी मा. सर्वोच्च न्यायालयाचे निकालांचा आधार देत आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी विशेष अनमोल मार्गदर्शन केले तसेच सदर खटल्याकामी तपास अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. सुनिल बाभड, पैरवी अधिकारी पो. हेड कॉन्स्टेबल 333 एल. आर. कदम यांचे सहकार्य लाभले. सदर प्रकरणात संपूर्ण शिंदखेडा परिसराचे लक्ष लागुन होते.
