पुणे- निपुण भारत कार्यक्रमांतर्गत मुलांना २१ व्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार करायचे असल्याने प्रत्येक मुलाला जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण देणे गरजेचे असून त्यासाठी शिक्षकांना कार्यशील राहावे लागणार आहे, असे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी अजिंक्य खरात यांनी केले.
राज्य शासनाच्या जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण विचार या संकल्पनेतून इंदापूर तालुका पंचायत समिती (शिक्षण विभाग) च्या वतीने श्री. नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर येथे दि.१२ ते १६ डिसेंबर २०२३ दरम्यान पार पडलेल्या शिक्षक कार्यशाळेत कुल क्र.१ (केंद्र- इंदापूर,अवसरी,रेडणी) च्या निरोप समारंभ कार्यक्रमावेळी ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे शिक्षण विस्तार अधिकारी संजय रुईकर हे लाभले. यावेळी कार्यशाळेचा उद्देश सुलभक नितीन साबळे यांनी सांगितला. कृष्णा शिंदे,नानासाहेब सानप, नितीन भोसले , शशिकांत शेंडे,अरुणा कवडे, मीरा घळके, मनिषा पोळ- मोरे आदी शिक्षकांनी प्रशिक्षण काळात आलेला अनुभव मनोगतातून मांडला.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार प्रशिक्षणार्थी शिक्षकांच्या वतीने करण्यात आला. यावेळी सुलभक पोपट जाधव, नितीन साबळे, महेश कणसे, परमेश्वर खंदारे आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन सुधीर देवकाते यांनी केले.तर आभार नितीन वाघमोडे यांनी मानले.
कार्यक्रमाचे आयोजन वसंत फलफले यांनी केले.
