धनगर समाजाला मिळालेला दुसरा कोहिनूर हिरा म्हणजे शशिकांत तरंगे- सत्यवान पांढरे
प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे:समाजाच्या उज्वल भविष्यासाठी योग्य वाटचाल!!
हो डॉ शशिकांत तरंगे साहेब... आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुमची चाललेली धडपड, धावपळ, तुमची निर्मळ भावना समजते हो, पण काही नेतृत्व ना अजून समजली नाही, अशा नेतृत्वाचे काय करायचे हे समाज इथून पुढच्या काळामध्ये ठरविलच, "डॉक्टर साहेब तुम्हाला एकच करायचा आहे हो" जे पाठीमागे झाले,ते इथून पुढच्या काळामध्ये झाले नाही पाहिजे, पुन्हा समाजामध्ये बी.के.कोकरे तयार झाले पाहिजेत, मुंडे -महाजन जोडी तयार झाली पाहिजे, याच्यासाठी तुमचा प्रामाणिकपणे प्रयत्न चालू आहे, त्याला "भविष्यात एक लाख % यश ही येईल" आणि ते तुम्ही यश प्राप्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही याची खात्री आहे आम्हाला
समाज बांधवांनो मागच्या काळामध्ये अण्णासाहेब डांगे, शिवाजी बापू शेंडगे, असे अनेक नेतृत्व होती त्या काळामध्ये सुद्धा असाच एक कोहिनूर हिरा उदयास आला होता, "स्वर्गीय बीके.कोकरे साहेब" या कोहिनूर हिऱ्याला जर त्यावेळेस सर्वांनी मिळुन भक्कम अशी साथ दिली असती, तर आज आपल्याला आपल्या समाजाची अशी दुरवस्था पाहायला मिळाली नसती,आज किमान पंचवीस ते तीस आमदार विधानसभेत दिसले असते, दोन-चार खासदार राज्यसभेत दिसले असते, परंतु आज जशी एकोप्याची वज्र मुठ डॉक्टर_शशिकांत_तरंगे साहेब बांधत आहेत, तशी एकीची मुट त्याकाळी कुणीही बांधली नाही, खुद्द बीके. कोकरे साहेबांनी बांधण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला यश मिळाले नाही, इतरांनीही प्रयत्न केले त्यालाही यश आले नाही, बी.के.कोकरे हे एक वेगळे व्यक्तिमत्व होतं, या भारत देशाचे प्रधानमंत्री व्ही पी सिंग हे दौंड येथील बी.के.कोकरे यांचे भाषण ऐकून भारावून गेले होते, ते भाषण ऐकून प्रधानमंत्रीनी
बी.के.कोकरे ना हेलिकॅप्टर मध्ये बसून मराठवाडा विदर्भ दौरा केला होता, हेलिकॅप्टर मध्ये बसणारा धनगर समाजाचा पहिला माणूस बी.के.कोकरे साहेब आहेत, "अरे बंधुंनो तो वाघ काय साधा सुधा नव्हता", खंबाटकी घाट आडवून सरकारला सळो की पळो करून सोडणारा होता, भंडार नामाचा वचन नामा घेऊन तेव्हाच्या विद्यमान मुख्यमंत्री महोदयांच्या निवासस्थानात स्वतःची फटफटी घुसणारा होता, तेव्हाच तर कुठे आपल्याला जे आत्ता आहे ते NT चे आरक्षण भेटले ना.
बंधुंनो डॉक्टर शशिकांत तरंगे साहेब यांना 2014/ 2019 ला लय चांगल्या ऑफर येऊन गेल्या, परंतु बंधुंनो या ढाण्या वाघाने जातीसाठी माती खाल्ली, आणि सर्व ऑफर झुगारून लावल्या, तेव्हाच आज कुठे आपला एक आमदार विधानसभेमध्ये निवडून गेला, माझ्यासारखा तरुण गाव गाड्यांमध्ये एखादी अन्यायकारक घटना घडली तर अभिमानाने सांगतोय, भाऊ अन्य करू नको पालकमंत्री आमचे आहेत, ते आमचा न्यायनिवाडा करतील, डॉक्टर शशिकांत तरंगे साहेब यांची एकच निर्मळ आणि निरपेक्ष भावना आहे, जे मागच्या काळात घडले ते इथून पुढे घडू नये, समाजाचे जे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लागावेत, समाजामध्ये एक मजबूत संघटन तयार व्हावे, समाजाला सत्तेचा योग्य तो वाटा मिळावा, यासाठी हा ढाण्या वाघ गेले कित्येक वर्ष झालं, रात्रंदिवस समाजातील सर्व नेतृत्वाना एकाच व्यासपीठावर ती आणण्यासाठी झगडतोय, रात्रीचा दिवस करतोय, समाज बांधवांनो वेळेत जागे व्हा, #आपल्यासाठी रात्र वैऱ्याची आहे "राज्यसत्ता आणि राज्य पाठ हा मागून मिळत नसतो" "तो नेहमीच हिसकाऊन घ्यायचा असतो" त्याच्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन, झेंडा आपला दांडा आपला ही एकच घोषणा करावी लागतीया........
बंधुंनो जे मागच्या काळात झालं ते इथून पुढच्या काळात होता कामा नाही पाहिजे, सर्वांनी एकीची वज्रमूठ बांधा, आणि सर्वांनी एकत्रित या, अन्यथा आपल्याला अशीच आपली दुरावस्था पुढच्या पिढीलासुद्धा पहावी लागेल, ना नेता मजबूत,ना संघटना मजबूत,ना आपल्याला अपेक्षित सत्तेचा वाटा, ना आपले आरक्षण, हा लेख मी माझ्या डायरीमध्ये आवर्जून, माझ्या मुलाला साक्षी ठेवून लिहिला आहे, त्याचे कारण की ज्यावेळेस बापूसाहेब कोकरे म्हणत होते, अरे गाव गाडीतल्या समाज बांधवांनो एकत्रित या, गावातल्या गाव पुढार्यांना मूठमाती द्या, एकीची वज्रमूठ बांधूया, "भीताय कुणाला" आपण मल्हारराव_यशवंतरावांचे मावळे आहोत, हाच लेख मागच्या काळामध्ये घोडदौड नावाच्या मासिक मध्ये माझ्या एका वडीलधाऱ्या व्यक्तीने मला साक्षी ठेवून लिहिला होता, तो साक्षात्कार आज मला पाहायला मिळतोय, त्याकाळी त्यांनी पुढच्या पिढीचे भविष्य सांगितले होते, जे तेव्हा सांगितले होते ती सर्व सत्य परिस्थिती आज पाहायला मिळत आहे, तेव्हा त्यांनी सांगितले होते आपण जर असे विकुरलेल राहिलो तर आपला एक आमदार निवडून आनने मुश्कील होईल, तोच एका आमदार या ढाण्या वाघ ने म्हणजे डॉक्टर शशिकांत_तरंगे यांनी सर्व ऑफर झुगारून लावून निवडून आनला आहे, त्यासाठी सर्व समाज बांधवांना माझे एक सांगणे आहे, जे #डॉक्टर_शशिकांत_तरंगे साहेब करत आहे ते अतिशय योग्य करत आहेत, त्यांना आपण सर्वांनी साथ द्यायला हवी, तेव्हाच कुठेतरी आपल्याला काहीतरी वेगळे पाहायला मिळेल, अन्यथा असाच "लेख पुढच्या पंचवीस-तीस वर्षाच्या काळामध्ये माझ्या मुलाला लिव्हा लागेल", ही वेळ येऊ देऊ नका अशी माझी सर्वांना विनंती आहे..
........... वाचूया अजून पुढच्या अंकामध्ये
✍️✍️ *श्री सत्यवान पांढरे*
MO/9604614443
Tags
news
