शासनाच्या योजना जागृत नागरिकांनी यशस्वीपणे राबविल्या पाहिजे-मकरंद पाटील नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे




शासनाच्या योजना जागृत नागरिकांनी यशस्वीपणे राबविल्या पाहिजे-मकरंद पाटील

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे

शहादा :- चांगल्या कामांची गुणवत्ता ठिकवून ठेवायची असेल  तर स्थानिक नागरिकांनी ठेकेदाराच्या कामांवर लक्ष ठेवून उत्तम काम करून घेतले पाहिजे. तरच दीर्घकाळपर्यंत  कामे मजबूत राहतील. लोकप्रतिनिधी शासनाच्या योजना नागरिकांसाठी राबवून नारळ फोडून निघून जातो स्थानिक व जागृत नागरिकांना ठेकेदाराकडून चांगले काम करून घेतले पाहिजे असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरपालिकेचे गटनेते प्राचार्य मकरंद पाटील यांनी पंचशील येथे आमदार राजेश पाडवी यांच्या प्रयत्नातून विकास कामाचे भूमिपूजन प्रसंगी मार्गदर्शन करतांना केले. 

शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी नेहमीच नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे लक्ष देऊन विकास कामे राबवीत आहेत. पंचशील परिसरात आमदार राजेश पाडवी यांनी गेल्या दोन वर्षापासून रस्ते व इतर कामांसाठी नेहमीच प्राधान्य दिले आहे. यापुढेही या परिसरात विकास कामे होत राहतील. रस्ते गटारी व पथदिवे आदी मूलभूत सुविधा पुरवल्या जातील. नागरिकांनी लोकप्रतिनिधींना सहकार्य केले पाहिजेत असे ही भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा पालिकेचे गटनेते प्राचार्य मकरंद पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले 

आमदार राजेश पाडवी यांच्या प्रयत्नातून पंचशील कॉलनी येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत ओपन प्लेस येथे फेवर ब्लॉक व काँक्रीट रस्ता मंजूर करून घेतला या विकास कामांचे भूमिपूजन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंदभाई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी मोहिदा ग्रामपंचायतचे सरपंच भाऊभाई पाटील, रिपाई जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, मुनेश जगदेव, दिनेश खंडेलवाल,शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे,मा.शहराध्यक्ष विनोद जैन, राजेंद्र भटुलाल अग्रवाल, महेश पाटील, हितेंद्र वर्मा, जयेश पाटील व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्रप्रमुख नरेंद्र नरेंद्र महिरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार उपस्थित मान्यवरांचे मानले परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने