कोठली ग्रामपंचायत भ्रष्टाचाराबाबत चौकशीत विलंब
तक्रारदार यांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा
शहादा प्रतिनिधी - नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत कोठली येथे विविध शासकीय कामात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोप करत या गावाचे ग्रामस्थ जिजावराव यशवंत पाटील यांनी पंचायत समिती शहादासमोर आमरण उपोषण केले होते. यावेळी प्रशासनाने लेखी आश्वासन देत चौकशी समिती स्थापन करून गोष्टींवर कारवाई करण्याबाबत आश्वासित केले होते. या उपोषणाची सांगता झाल्यानंतर निर्भीड विचार ने दिलेल्या वृत्तांत प्रशासनाने चौकशी समितीच्या नावाने आंदोलकांची बोडवण केली असे वृत्त देखील प्रसारित केले होते. आमच्या या वृत्ताला आता दुजोरा मिळत असून अद्याप या पंचायतीच्या चौकशी करण्यासाठी समितीने कोणतेही कामकाज केले नसल्याच्या आरोप करत तक्रारदार यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार ,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार, व गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना दिले आहे.
यात नमूद केले आहे की दि.3/11/2023 रोजी दाखल केलेल्या तक्रार अर्जावर एक महिन्याचा आत कार्यवाही केली नाही म्हणुन मी दि.1 डीसेंबर 2023 पासुन पासुन शहादा पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसलो होतो. मात्र गटविकास अधिकारी, पं.स. शहादा, पोलिस निरिक्षक शहादा व सारंगखेडा यांनी विनंती केल्यानुसार व सात दिवसात चौकशी समीती नेमुन कोठली ग्रा.पं.ची तपासणी करुन दोषीवर कारवाई करण्याचे तोंडी व लेखी आश्वासन दिल्यानुसार दि. 4 डीसेंबर 2023 रोजी उपोषण स्थगीत केले होते. मात्र आज अखेर आपण चौकशी समीती न नेमता कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे भ्रष्ट्राचार करणा-या कोठली गावच्या सरपंच, ग्रामसेविका तसेच ग्रामपंचायत सदस्य असलेल्या सरपंच पुत्राबरोबर आपले आधिकारी सुद्धा सामिल असुन आपण अपहार क रणा-यांना अप्रत्यक्षरित्या पाठीशी घालत आहात व भ्रष्ट्राचा-यांना भ्रष्ट्राचार करण्यास पाठिंबा देत आहेत असे दिसुन येत आहे.
तत्काळ दोन दिवसात चौकशी समीती नेमुन माझ्या तक्रार अर्जातील सर्व मुद्याची निपःक्षपातीपणे चौकशी करुन अपहार करणा-या तसेच तीन वर्षात एकही ग्रामसभा न घेणा-या कोठली ग्रा.पं. च्या सरपंच, ग्रामसेविका तसेच ग्रामपंचायत सदस्य असलेल्या सरपंच पुत्रावर कारवाई न केल्यास दि.14 डीसेंबर 2023 वार गुरुवार पासुन शहादा पंचायत समीती कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार आहे असा इशारा त्यांनी या पत्रातून दिला आहे.
