आगामी विधानसभा निवडणुकीत शहादा तळोदा मतदार संघामध्ये विजय राष्ट्रवादी काँग्रेसचा - माजी आमदार उदेसिंग पाडवी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे




आगामी विधानसभा निवडणुकीत शहादा तळोदा मतदार संघामध्ये विजय राष्ट्रवादी काँग्रेसचा - माजी आमदार उदेसिंग पाडवी 

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे

शहादा, ता.११ : 
   आगामी विधानसभा निवडणुकीत शहादा तळोदा मतदारसंघांमध्ये  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मी निवडणूक लढविणारच आणि  जिंकेल ही असा निर्धार व्यक्त करून संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत केले जाईल आणि शहाद्याच्या आमदार हा राष्ट्रवादीचाच होईल असा विश्वास व्यक्त करत कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी केले.




      शहादा  राष्ट्रवादीच्या  पदाधिकाऱ्यांना पदनियुक्तीचे पत्र वाटप समारंभात शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार उदयसिंग पाडवी   पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हा बुथबांधणी अभियानाचे अध्यक्ष केसरसिंग क्षत्रिय, तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हितेंद्र क्षत्रिय, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव ऍड. दानिश पठाण, ओबीसी सेलचे प्रदेश सचिव दीपक पाटील, महिला जिल्हाध्यक्ष मंजुळा पाडवी, युवती जिल्हाध्यक्ष तिथल पावरा, ओबीसी जिल्हाध्यक्ष विलास पाटील, पदवीधर जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, शहादा विधानसभा अध्यक्ष कुणाल पाटील  तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील  शहराध्यक्ष एन. डी. पाटील उपस्थित होते 
      बोलताना उदयसिंग पाडवी म्हणाले की पक्षाचे संस्थापक श्री शरद पवार यांच्या विचारांशी जोडलेल्या कार्यकर्त्यांना घेऊन पक्ष संघटन मजबूत करीत आहोत आमचे मार्गदर्शक आमदार एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा मतदारसंघात पक्षातर्फे  निवडणूक लढविणार आहे मी आमदार असताना सुमारे 800 कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत त्यांच्या आमदार पुत्राच्या विरोधात निवडणूक लढविणार का या प्रश्नावर बोलताना श्री पाडवी म्हणाले की  ही पिता पुत्रांची लढाई नसून प्रतिगामी विरोधात पुरोगामी विचारांची लढाई आहे मी चांगले काम करूनही त्यावेळी माझ्याशी दगाबाजी करून उमेदवारी ऐनवेळी नाकारण्यात आली यावेळी मी पुन्हा पूर्ण ताकदीने निवडणूक लढविणार असून जिंकूनही दाखवील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला त्या अनुषंगाने शहादा तळोदा मतदार संघात समाजातील सर्वच घटकांना सोबत घेऊन  पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने अभियान राबविले जात आहे त्यासाठी गाव पातळीवर व जिल्हा स्तरावर जम्बो कार्यकारणी करून पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत
        *दरम्यान* यावेळी जिल्ह्यासह शहादा  शहर व तालुका कार्यकारणी र्जिल्हाध्यक्ष उदेसींग पाडवी यांनी जाहीर केली शहादा शहराध्यक्षपदी एन .डी. पाटील तर तालुका अध्यक्षपदी चंद्रकांत रामदास पाटील यांची  तर पदवीधर संघटना जिल्हाध्यक्षपदी 
शशिकांत वसंत पाटील  यांची निवड करण्यात आली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने