सखल क्षत्रिय राजपूत समाज आक्रमक, स्व. सुखदेवसिंग गोगामेडी यांच्या हत्या-यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा करण्याची मागणी प्रतिनिधी सुमित गिरासे




सखल क्षत्रिय राजपूत समाज आक्रमक, स्व. सुखदेवसिंग गोगामेडी यांच्या हत्या-यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा करण्याची मागणी

प्रतिनिधी सुमित गिरासे

 नाशिक -राष्ट्रीय राजपूत करणी सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय सुखदेवसिंह गोगामेडी यांना ५ डिसेंबर रोजी जयपूर राजस्थान येथील त्यांच्या राहात्या घरात घुसून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्या निषेधार्थ आज गुरुवार दिनांक 7/12/2023 रोजी नाशिकचे *सखल क्षत्रिय राजपूत समाज नाशिक* यांनी एकत्र येत पंचवटी निमाणी बस स्टॉप जवळील  महाराणा प्रतापसिंह स्मारक नियोजित जागेवर  परशुराम पुरिया गार्डन दिंडोरी नाका येथे स्व. सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या
फोटो ला पुष्पहार अर्पण करून दिवा व मेनबत्ती लावून श्रद्धांजली वाहिली . 
यावेळी सखल क्षत्रिय राजपूत समाजाने सुखदेवसिंह दादा गोगामोडी अमर रहे-अमर रहे व मारेकरी यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे च्या घोषणा देण्यात आल्या .  या प्रकरणातील जे कोणी मुख्यआरोपी व सह आरोपी यांना  तातडीने गुन्हा फास्टट्रॅक वरती घेवुन त्यांच्यावर तातडिने खटला दाखल करुण कार्यवाही करण्यात यावी.अशी मागणी करण्यात आली . 
या वेळी महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समिती नाशिक, हिंदू एकता आंदोलन पक्ष, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा, महाराणा प्रताप सेवा संस्था,महाराणा प्रताप उन्नती मंडळ, महाराणा प्रताप बहुउद्देशीय संस्था, अखिल भारतीय कातारी शिकलकर समाज संघ,  राजपूत बेलदार समाज, 
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना,श्री राजपुत करणी सेना,नाशिक .सखल क्षत्रिय परदेशी राजपूत समाज, महाराणा युवा सेना, महाराणा उद्योजक लाॅबी, राणा की सेना या सर्व राजपूत संघटनाचे तसेच सामाजिक संघणांचे पदाधिकारी व कार्यकर्ते स्व. सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या श्रध्दांजली च्या ठिकाणी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने