चर्मकार बांधवांना अपमानास्पद वागणूक अपशब्द वापरणाऱ्या विरोधात नंदुरबार येथे जिल्हाधिकारी कार्यालय समोर चर्मकार समाजातर्फे उपोषण




चर्मकार बांधवांना अपमानास्पद वागणूक अपशब्द वापरणाऱ्या विरोधात नंदुरबार येथे जिल्हाधिकारी कार्यालय समोर चर्मकार समाजातर्फे उपोषण सुरू केले आहे.

         *शहादा येथील चर्मकार समाज बांधवांना शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व कर्मचारी यांनी दिलेल्या अपमानास्पद वागणूक व अपशब्द वापरल्याप्रकरणी संबंधितांवर लवकर लवकर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले लवकरात लवकर कारवाई न झाल्यास यासंदर्भात तीव्र आंदोलन व उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी समस्त चर्मकार समाजातर्फे देण्यात आला आहे*
          *गणपती उत्सव काळादरम्यान पहिल्या टप्प्यातील विसर्जन मिरवणूक वेळी चर्मकार गणेश मंडळातील कार्यकर्त्यात झालेल्या वादाच्या संदर्भात शहादा पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक यांनी बोलावल्यानंतर शहादा पोलीस स्टेशनमध्ये अपमानास्पद अपमान जनक वागणूक देऊन जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप चर्मकार समाजाकडून करण्यात आला आहे या संदर्भात चर्मकार समाजातर्फे ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई व्हावी यासाठी संबंधित प्रशासकीय अधिकारी नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी विधान परिषदेचे आमदार आमशा दादा पाडवी यांना निवेदन देण्यात आले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे होते यांना समक्ष भेटून निवेदन देऊन सुद्धा चौकशी हळुवारपणे सुरू असल्याचा आरोप यावेळी चर्मकार समाजातर्फे करण्यात आला.*
           *यामुळे चर्मकार समाजाने व्यथित होऊन न्याय न मिळाल्यामुळे दिनांक सात डिसेंबर 2023 पासून आमरण उपोषणास बसण्याचा कठोर निर्णय घेतला होता त्याप्रमाणे आज दिनांक 7डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजेपासून नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषणास सुरुवात केली असून जोपर्यंत ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करून न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण हे सुरूच ठेवणार असल्याचे समजते*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने