ओबीसी नेत्यांच्या तोफा उदया इंदापुरात घडणार धडाडणार प्रतिनिधी दत्ता पारेकर




ओबीसी नेत्यांच्या तोफा उदया इंदापुरात घडणार धडाडणार 

 प्रतिनिधी दत्ता पारेकर

 पुणे: उद्या शनिवार दिनांक 9 /12/ 2023 रोजी इंदापूर शहरात ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील  ओबीसींचा एल्गार ही पहिलीच सभा इंदापूर येथे होणार आहे . या सभेची सर्व तयारी झालेली आहे.
या सभेसाठी एक लाख नागरिक उपस्थित राहतील असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. त्याप्रमाणे त्यांनी सभेच्या ठिकाणी नियोजन केले आहे. पार्किंग व्यवस्था ,चहापाणी, नाश्ता इंदापूर शहराच्या चारी बाजूने येणाऱ्या रस्त्या वर करण्यात आले आहे .

नवीन प्रशासकीय इमारत शंभर फुटी रोड लागत मैदान येथे दुपारी 1 वाजता ही सभा होणार आहे. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, माजी मंत्री महादेव जानकर ,आमदार गोपीचंद पडळकर, शब्बीर अन्सारी ,प्राध्यापक टीपी मुंडे, ऍडव्होकेट बबनराव तावडे, प्राध्यापक लक्ष्मण गायकवाड , नाभिक समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव दळे ,हे उपस्थित राहणार आहेत.

 तरी या सभेसाठी सकल  ओबीसी बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने