भिमाई आश्रमशाळेत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन !
प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे:भारतातील वंचित,गरीब व पीडितांच्या प्रश्नांची सोडवणूक करुन त्यांना त्यांचे हक्क अधिकार प्रदान केले तरच बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनी खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल असे वक्तव्य डॉ. महामानव आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात आयोजित कार्यक्रमात भारत मुक्ती मोर्चाचे कार्याध्यक्ष नानासाहेब चव्हाण यांनी केले.
मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदान वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब
आंबेडकर शैक्षणिक संकुलात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ६७ व्या महापरिनिर्वाण दिन अभिवादन करण्यात आले.
यावेळी सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत गौतम बुद्ध मूर्तीस पुष्प,डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इंदापूरचे माजी नगराध्यक्ष, संस्थेचे तत्कालीन दिवंगत अध्यक्ष रत्नाकर मखरे (तात्या) यांच्या प्रतिमांना इंदापूरच्या माजी नगरसेविका, संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे (काकी) यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमस्थळी बुद्ध वंदना घेण्यात आली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांनी भाषणे व गीते सादर केले.
उत्कृष्ट भाषणं करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकं भेट दिली.
यावेळी कार्यक्रमास संस्थेचे सचिव ॲड.समीर मखरे, संचालक गोरख तिकोटे, हनुमंत कांबळे, रवी चव्हाण तसेच प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक साहेबराव पवार, माध्यमिक,उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या प्राचार्या अनिता साळवे तसेच विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, अधिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिरालाल चंदनशिवे यांनी केले.
