दामळदा ग्रामपंचायत जिल्ह्यासह राज्यात आदर्श ग्रामपंचायत बनविण्याचा संकल्प नव



दामळदा ग्रामपंचायत जिल्ह्यासह राज्यात आदर्श ग्रामपंचायत बनविण्याचा संकल्प 

शहादा - 
    ग्राम विकासाच्या विविध योजना राबवून ग्रामस्थांना मूलभूत सुविधा पुरविण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून दामळदा ग्रामपंचायत जिल्ह्यासह राज्यात आदर्श ग्रामपंचायत बनविण्याचा संकल्प नवनिर्वाचित उपसरपंच डॉक्टर विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला
     शहादा तालुक्यातील दामळदा ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी डॉक्टर विजय चौधरी यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांनी सरपंच हिराबाई ठाकरे व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत दामळदा ग्रामपंचायतला आदर्श गाव बनविण्याचा संकल्प व्यक्त केला ते म्हणाले ग्रामस्थांनी आमच्या ग्रामविकास क्रांति बॅनरला एकतर्फी सत्ता हाती दिली त्यासाठी पॅनल प्रमुख संजय चौधरी अशोक पाटील प्रवीण पाटील पुनमचंद पाटील कैलास पाटील दिलीप पाटील संभू ठाकरे आप्पा सूर्यवंशी पुष्पराज पाटील भाईदास ठाकरे नारायण ठाकरे नवीन माळी प्रताप ठाकरे धना मुसळदे आदींचे सहकार्य लाभले असल्याने ग्रामस्थांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही राज्यातील आदर्श ग्रामपंचायती असलेल्या राळेगणसिद्धी, हिवरे बाजार यांच्याप्रमाणेच पाटोद पॅटर्न प्रमाणे दामळदा गावात विकासाच्या योजना राबविल्या जातील या  ग्रामपंचायतींना सर्व सदस्यांच्या उपस्थितीत भेट देऊन माहिती घेतली जाईल त्या अनुषंगाने सर्वच सदस्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे सरपंच हिराबाई ठाकरे यांच्याकडे अर्थ व नियोजन विभाग उपसरपंच डॉक्टर विजय चौधरी यांच्याकडे बांधकाम  जलसिंचन व ग्रामपंचायत कार्यालयीन कामाचे नियोजन सदस्य रवींद्र खैरे यांच्याकडे आदिवासी क्षेत्रातील पीएसआय योजनेअंतर्गत विविध योजनांची कामे शितल पाटील यांच्याकडे गावातील पाणीपुरवठा योजना रामदास ठाकरे यांच्याकडे गावातील शांतता अबाधित राखण्यासाठी गृह विभाग ललिता खैरे यांच्याकडे महिला व बालकल्याण विभाग द्वारकाबाई मालचे यांच्याकडे शिक्षण क्षेत्रातील जबाबदारी अनिता माळी यांच्याकडे आरोग्य व स्वच्छतेची जबाबदारी नयना पाटील यांच्याकडे गावातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविणे कामी कृषी व पशुसंवर्धन क्षेत्राची जबाबदारी आणि राजू सोनवणे या सदस्याकडे समाज कल्याण योजनेअंतर्गत गावातील गरजू व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे अशाप्रकारे सर्वच सदस्यांवर विविध विकास कामांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून त्या अनुषंगाने प्रत्येक महिन्याला आढावा देखील घेतला जाणार आह गावाचा विकास साधण्याकरिता लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे देखील सहकार्य घेतले जाणार असून दामळदा गाव आगामी काळात आदर्श गाव म्हणून नावारूपास येईल असेही डॉक्टर चौधरी यांनी सांगितले
          
नऊ सदस्य असलेल्या दामळदा ग्रामपंचायतीत काल दिनांक ५ रोजी उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली त्यात डॉक्टर विजय चौधरी यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने