**रोटरी प्री-प्रायमरी स्कूलमध्ये क्रीडामहोत्सव उत्साहात**
दोडाईचा(अख्तर शाह)
दोंडाईचा येथील श्रीमती बसंतीबाई पाबुदानजी संचेती रोटरी प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये जिल्हा परिषद निमगुळ केंद्रशाळेच्या मा. मुख्याध्यापिका शकुंतला बागल, इनरव्हील क्लब ऑफ दोंडाईचाच्या मा. अध्यक्षा माधुरी आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत वार्षिक क्रीडा उत्सव सागर विहार जवळील मैदानावर पार पडला.या कार्यक्रमाला स्कूलचे संचालक श्री पी.सी शिंदे, सौ. हेतल शाह, नगरसेवक प्रवीण महाजन, इंचार्ज बतुल बोहरी, पालक-शिक्षक संघाच्या सदस्या दीक्षा पाटील व पालक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व श्रीमती बसंतीबाई संचेती, श्रीमती मंदाकिनीताई टोणगांवकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यावेळी ज्युनिअर केजी व सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी धावणे, बिट्स कलेक्टिंग,बूट व पायमोजे घालणे, चेंडू गोळा करणे,लिंबू चमचा, ऑफ स्टिकल रेस,टी-शर्ट घालणे या विविध खेळांच्या स्पर्धेत उत्स्फुर्तपणे सहभाग घेऊन विजय संपादन करण्याचा प्रयत्न केला. या स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. खेळातील सर्व सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.
पालकांनीही पाल्याबरोबर खेळात सहभागी होऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला..
इंचार्ज बतुल बोहरी यांनी प्रास्ताविकात शाळेच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील प्रगतीची माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सातत्य टिकविण्यासाठी रोटरी स्कूल सदैव प्रयत्नशील असल्याचे मत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्या शकुंतला बागल व माधुरी आव्हाड यांनी आपल्या भाषणात खेळामुळे शरीर सुदृढतेबरोबरच मनही प्रसन्न राहत असल्याचे म्हटले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी क्रीडाशिक्षिका पूजा गिरासे, राजश्री भदाणे, पल्लवी जोशी, स्वाती गोसावी, रूपाली जैन , योगिता सूर्यवंशी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. मोनिका तोरवणे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
