राज्य उत्पादन शुल्क विभागाची दारू साठा वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई
प्रतिनिधी सुमित गिरासे नंदुरबार
शहादा - राज्य उत्पादन शुल्क सिमा तपासणी नाका खेडदिगर या पथकाने शहाणा मंदाणा रस्त्यावर वडगाव शिवार ता. शहादा, जि. नंदुरबार अवैध्यपणे परराज्यातील मदयाची वाहतुक करतांना पिकअप वाहनासह रु.१६,०६,०००/-किमतीचा मुददेमाल जप्त केला आहे.
दि. १९/१२/२०२३ रोजी माडॉ. श्री. विजय सुर्यवंशी साहेब, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, मा.श्री सुनिल चव्हाण साहेब संचालक (अं व द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा. डॉ. श्री. बी. एच तवी साहेब विभागीय उपायुक्त नाशिक विभाग, नाशिक, सौ स्नेहा सराफ मॅडम, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त बातमीनुसार शहाणा-मंदाणा रस्त्यावर वडगाव शिवार ता शहादा, जि. नंदुरबार येथे महीद्रा कंपनीची बोलेरो पिकअप चारचाकी वाहन तिचा क्र. MH-१८-BG-५८१९सदर बाहनाची तपासणीकेली असता सदर बाहनामध्येरॉयल ब्ल्यु विस्की ७५० मि.ली क्षमतेच्या एकुण २६४० बाटल्या (२२० चॉक्स) दिसुन आलेतेथे वाहनासह आरोपी नामे रोहीत राधेश्याम तिरमले वय-२३ वर्ष रा संत गाडगेनगर, बोराडी, ता. शिरपूर, जि.धुळे या आरोपी इसमास अटक करण्यात आली असून पिकअप वाहनासह एकूण रू. १६,०६,०००/-चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्हयातील मुख्य सुत्रधार फरार आहे. सदर कारवाई महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत कलम६५ (अ) (ई),८०,८१.८३,९८/२) व १०८ अन्वयेकरण्यात आली
सदरची कार्यवाही श्री डी. बी. कोळपे प्र. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सिमा तपासणी नाका खेडदिगर ता. शहादा, जि. नंदूरबार, श्रओएच. पी. घरटे, दु.निरीक्षक, श्री आर एल राजपुत सहा दु. निरीक्षक, जवान श्री. आर. एन. पावरा यांनी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास. श्रो.डी. बी. कोळपे प्र.निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सिमा तपासणी नाका खेडदिगर ता. शहादा जि. नंदुरबार हे करीत आहेत.
