ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे ही मागणी
जालना येथील उपोषणाला शिरपूर ब्राम्हण समाजाचा पाठिंबा
शिरपूर -ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाने स्थापन करावे या मागणीसाठी जालना येथे आमरण उपोषणाला दि..२८ नोव्हेंबर रोजी बसलेल्या ब्राह्मण समाजाचे महाराष्ट्राचे समन्वयक श्री. दीपकजी रणनवरे यांना पाठिंबा देत असण्याबाबत राज्य शासनाने ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी शिरपुर ब्राह्मण समाज तर्फे करण्यात आली आहे. याबाबत नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर साहेब यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या माध्यमातून पाठींबा देण्यात येत असल्याचे म्हटले आहे. निवेदन देण्यासाठी शिरपुर ब्राह्मण समाजाचे समन्वयक केतन पंडित , सुशील तिवारी महाराज, राजेश त्रिवेदी महाराज, शिरपूर अध्यात्मीक संघटनाचे अध्यक्ष बापुसाहेब पाटिल, राहुल पंडित, पुष्पक शर्मा, शुभम शर्मा, अजिंक्य कुलकर्णी, अमित शर्मा, हेमंत एडकी यावेळी उपस्थित होते.
