शिरपूर की गांजा पूर, पोलिसी कारवाईत वारंवार सापडतो गांजा..
शिरपूर शहर पो.स्टे.ची कारवाईत पुन्हा गांजा हस्तगत
महेंद्रसिंह राजपूत -शिरपूर
मागील काही काळापासून शिरपूर हे गांजापुर म्हणून उदयास येत आहे. तालुक्यातील वनपट्टे क्षेत्रात वारंवार पोलिसांकडून गांजा शेतीवर कारवाई केली जात आहे. हे कमी की काय यानंतर शिरपूरचे मुंबईपर्यंत गांजा कनेक्शन समोर आले होते. वारंवार तालुक्यातील मध्यप्रदेशा सोबत देखील जोडले जाते. आता पुन्हा शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत गांजाचे मध्य प्रदेश कनेक्शन उघड झाले आहे. त्यामुळे शिरपूर तालुका गांजापूर म्हणून कलंकित होत आहे.
शिरपूर शहरात छोट्या पद्धतीने गांजा विक्री झालेल्या आरोपीस मुद्देमालासह रंगेहात अटक करण्यात शहर पोलिसांच्या शोध पथकाला यश आले आहे. मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे सततची कारवाई करण्यात आली.
शिरपूर शहर पो.स्टे. चे पोनि आगरकर यांना दि.०३/१२/२०२३ रोजी २१.४५ वाजेचे सुमारास गुप्त यानमांदाग मार्फत बातमी मिळाली की, शिरपूर जि. धुळे शहरातील खंडेराव महाराज मंदिरा मार्ग नाना नानी पार्कजवळ रात्री १०.४५ वाजेचे सुमारास एक इसम त्याने अंगात आकाशी रंगाचे फून बाहीचा टी शर्ट व काळ्या रंगाची नाईट पंन्ट घातलेला त्याची दाढी वाढलेली त्याचेजवळ राखाडी रंगाची बंगमध्ये गांजा माल घेवून तो येणार असल्याबाबत बातमी मिळाली होती.
त्यानुसार पांनि आगरकर यांनी बातमीप्रमाणे छापा कारवाई करणेकामी तहसिल कार्याग्नय शिरपुर येथील राजपत्रित अधिकारी तसेच दोन सरकारी पंच, वजनकाटा धारक, फोटो ग्राफर अशांना बोलावुन त्यांचेसह नसंच शिरपुर शहर पो.स्टे. चे पोलीस अधिकारी व शोध पथकाचे अंमलदारांसह शिरपूर जि. धुळे शहरातील खंडेराव महाराज मंदिरा मागे नाना नानी पार्कजवळ जावून सापळा लावला असता बातमी मधील नमूद वर्णनाचे कपडे घानलेला एक इसम खंडेराव महाराज मंदिराकडून रस्त्याने पायी येतांना दिसल्याने त्याचा संशय आल्याने त्याचेवर रात्री ११.४५ छापा टाकून त्यास ताब्यात घेवुन त्याचे जवळ असलेल्या बंगेची तपासणी केली असता त्याचे वंगेमध्ये एकूण ३५.१५०/- रूपये किंमतीचा मानवी मेंदूवर परिणाम करणारा आंबट उग्र वासाचा ओला बिया, पाला व काड्या मिश्रीन गांजा नावाचा अंमली पदार्थ तसेच १०,०००/- रूपये किंमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल व २००/- रूपये किंमतीची बंग असा एकुण ४५.३५०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्यानं जप्त केला असुन त्याबाबत पोहेका/ललीत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नामे फैजानअली आबीद अली वय २७ रा. आझादनगर, इंदार राज्य मध्य प्रदेश याचेविरूध्द शिरपूर शहर पो.स्टे.ला गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन १९८५ चे कलम २० (ii), (ब) व २२ (व) प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्यात त्यास अटक करून उल्लेखनीय कार्मागरी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक आगरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोर्शन/संदिप मुरकुटे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक किशार काळे,
तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पो. स्टे. चे पोलीस निरीक्षक ए.एस. आगरकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे, संदिप मुरकुटे, संदिप दरवडे तसेच डो. बी. पथकाचे पाहकां/ललित पाटील. पांना/रविंद्र आखडमल, पोकां/गोविंद कोळी, विनोद आखडमल, योगेश दाभाडे, प्रशांत पवार, भटू साळुंके, र्साचन याघ, मनोज दाभाडे, मनोज महाजन, दिपक खैरनार व चापांकों/ विजय पाटील तसेच होमगार्ड मिथुन पवार व शरद पारधी अशांनी मिळून केली आहे.
