व्यापाऱ्यांना नाही प्रशासनाची भीती? शहादा भाजीमार्केट मधे प्लॅस्टिकचा सर्रास विक्री
नगरपालिका प्रशासन प्लास्टिक विक्रेता करणाऱ्यांवर कारवाई करणार का.?
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे
प्लास्टिक मुक्तीसाठी झटणाऱ्या शहादा शहरात पुन्हा एकदा प्लास्टिक पिशव्यांचा बोलबाला सुरू झाला आहे. शासनाने बंदी घालूनही अनेक फळविक्रेते तसेच हातगाडीधारक या पिशव्यांचा खुलेआम वापर करत आहेत. काही फळविक्रेत्यांना 'प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आहे ना' असा प्रश्न केल्यास "अहो साहेब... काय नाही होत, घ्या तुम्ही' असं उत्तर बिनदिक्कतपणे दिलं जात आहे. बंदी असतानाही पिशव्या उपलब्ध होत असल्याने प्लास्टिक बंदी ही नावापुरतीच असल्याचे चित्र शहादा शहरात दिसून येत आहे.
शहरात फक्त प्लास्टिक पिशव्यांच्या वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईची नाही तर बंदी असलेल्या पिशव्यांची ठोक विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर देखील कारवाईची गरज व्यक्त केली जात आहे.
राज्यात 40 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी होती. पण काही महिन्यांपूर्वी राज्य शासनाने सरसकट प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कायद्यात सुधारणा करुन कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या हॉटेल व्यावसायिक आणि विक्रेत्यांवर फौजदारी कारवाई, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना तीन ते सहा महिने शिक्षा आणि परवाना रद्द करण्याची तरतूद होती. त्याची अंमलबजावणी काही काळ प्लास्टिक पिशव्या जप्त करून करण्यात आली. परंतु कालांतराने परिस्थिती तशीच आहे. शासनाने प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातली असूनही त्यांचा सर्रास वापर होत आहे. शासनाने 40 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी घातलेली असल्याचा विसर अनेक विक्रेत्यांना पडला असल्याचे दिसून आले आहे.
मात्र हे सर्व नव्याचे नऊ दिवस ठरले असून नगरपालिका प्रशासनावस्थेतील या कायद्याच्या विसर पडला आणि व्यापाऱ्यांना देखील कोणतीही कायद्याची भीती नाही असे दिसत आहे. त्यामुळे शहादा शहरात प्लास्टिक बंदी फक्त कागदावर आहे का ? असे विचारण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
••कोणत्या प्लास्टिक वापराला बंदी?:-
राज्य सरकारने १५ जुलै २०२२ ला अधिसूचनेद्वारे प्लास्टिक लेपीत आणि प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर देखील बंदी घातली आहे. या सुधारणेनंतर राज्यात प्लास्टिक लेपीत तसेच प्लॅस्टिक थर असणाऱ्या पेपर किंवा अॅल्युमिनियम इत्यादींपासून बनवलेले डीस्पोजेबल डीश, कप, प्लेट्स, ग्लासेस, काटा, वाडगा, कंटेनर इत्यादी एकल वापरावर, वापर उत्पादनावर बंदी आहे. दैनंदिन कचऱ्यातील प्लास्टिकचा कचरा कमी करणे हा बंदीमागचा मुख्य उद्देश आहे.
