शहादा तालुक्यातील असलोद ग्रामपंचायत येथील विकास कामातील व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात गावातीलच दिनेश नथ्थू पाटील ,राधेश्याम दौलत तांबे, वेडू शामराव पाटील हे पंचायत समिती शहादा कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते.
त्यांच्या आंदोलनादरम्यान विविध राजकीय सामाजिक प्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन त्यांना समर्थन दर्शवले होते. असलोद ग्रामपंचायतच्या गैरकारभाराची चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई करावी अशी प्रमुख मागणी त्यांनी ठेवले होती. शिवाय गावातील अतिक्रमणाबाबत देखील अनियमितता याबाबत देखील चौकशीची मागणी केली होती.
मात्र आंदोलन करते यांच्या निवेदनात केलेल्या एक ते नऊ या मागण्या यांची पूर्तता 31.1.2023 या एका महिन्याच्या कालावधीत पूर्ण करण्यात येतील असे लेखी आश्वासन ग्रामपंचायत असलोच्या सरपंचांनी दिल्याने सदरचे आंदोलन सशक्त स्थगित करण्यात आले आहे.
यावेळी मकरंद पाटील शहादा ,असलोद् सरपंच प्रकाश नाना, मंदाने उपसरपंच शरद साळुंके ,किशोर कदम, दिलीप पाटील सर, असलोद दिलवर गिरासे असलोद ,अनिल भामरे मंदाने, सुनील गायकवाड, रवींद्र रावल,
अजय सोनवणे ग्रा.पं. सदस्य असलोद यांच्या मध्यस्थीने सदस्य आंदोलनाची सांगता करण्यात आली.
