शिरपूर तालुका राजपूत समाजाची बैठक संपन्न
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यात राजपूत समाज मोठ्या प्रमाणावर असून देखील समाजाला एक प्रभावी संघटनाची आवश्यकता असल्याने सर्व समाज बांधवांनी एकत्र येत संघटन उभे करण्याच्या उद्देशाने दरमहा एक सामूहिक मीटिंग घेऊन त्यातून चर्चा सत्र च्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवर चर्चा करून अंमलबजावणीसाठी एकत्र यावे अशी संकल्पना स्वर्गीय सुखदेव सिंह गोगामडी यांच्या अस्थिकलस विसर्जनाच्या वेळी मांडण्यात आली होती. त्यावेळेस जाहीर करण्यात आले होते की दरमहा एक समाजाची मीटिंग आयोजित केली जाईल. त्यानुसार आज दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता राजपूत भवन, स्वर्गीय इंद्रसिंह भाऊसाहेब मेमोरियल हॉल शहादा रोड शिरपूर येथे आयोजित करण्यात आली होती. यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून समाज बांधवांना माहिती देण्यात आली होती.
यावेळी प्राथमिक स्वरूपात समाज बांधव व समाजातील ज्येष्ठ नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी एक नवीन सामाजिक संघटन तयार करणे, संघटनेचे ध्येयधोरणे उद्दिष्टे निश्चित करणे, संघटना रजिस्टर करून पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करणे, बांधवांना सभासद करणे, संघटनेचे कार्यकारणी तयार करणे, व समाज बांधवांकडून आलेल्या सूचनांवर विचार विनिमय करून कार्यवाही करणे इत्यादी विषयावर चर्चा संपन्न झाली. यावेळेस महिला भगिनी देखील उपस्थित होत्या.
या संघटनेची पुढील वाटचाल निश्चित करण्यासाठी संघटनेने दरमहा मीटिंग घेण्याचे नियोजन केले असून या पुढील मीटिंग 29 जानेवारी रोजी शहादा रोड येथील राजपूत भवन येथे दुपारी तीन वाजता घेण्याचे नियोजित करण्यात आले आहे. पुढील मिटींगच्या संदर्भात समाज बांधवांना माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समाज बांधवांना देण्यात येईल. शिवाय ही फक्त एक प्राथमिक सुरुवात असून यापुढे होणाऱ्या नियोजित मीटिंगसाठी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे , व संघटन मजबूत करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा अशी विनंती शिरपूर तालुका राजपूत समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
