मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विविध मागण्यांसाठी उप विभागिय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा




मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विविध मागण्यांसाठी उप विभागिय अधिकारी  कार्यालयावर धडक मोर्चा 

शहादा :- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विविध मागण्यांसाठी कॉम्रेड सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी  कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला प्रांत अधिकारी श्री दळवी यांना शिष्टमंडळाने विविध मागण्याचे निवेदन देऊन मागण्या पूर्ण करण्याची मागणी लावून धरली. प्रांताधिकारी श्री दळवी यांनी स्थानिक पातळीवरील ज्या मागण्या असतील त्या शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल रोजगार हमीचे कामे शिधापत्रिका मजुरांचे स्थलांतर स्थानिक रोजगार दर धरणाचे बुडीत झालेल्या क्षेत्राची भरपाई कापसाला योग्य भाव या मागण्या सोडवण्यात येतील असे आश्वासन मोर्चेकर्‍यांना प्रांताधिकारी यांनी दिले

याबाबत प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की
 मार्क्स वादी कम्युनिस्ट पक्ष, जातीअंत संघर्ष समिती, आणि महाराष्ट्र राज्य शेतमजुर युनियन (लालबावटा शहादा) यांचेवतीनेमहाराष्ट्र शासनाने व केंद्र शासनाने गायरान व पडीक जमीनीचा कायदा केला आहे. तसेच वनाधिकार कायदादेखील केला आहे. पंरतु वरील दोन्ही कायद्यांची अंमलबजावनी न करता या ज्या भूमीहीन लोकांनी पोटाची खळगी भरण्यासाठी ज्या जमीनी कसत आहेत अशा जमीनीवरुन हाकलण्यासाठी शासनामार्फत नोटीसा बाजावण्यात येत आहेत. तसेच बेघर लोक गायरान व पडीक जमिनीवर घरे बांधुन राहत आहेत. त्यांनाही अतिक्रमाण काढण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

1990 पुर्वी अतिक्रमण करुन पिके घेणान्या भुमीहिनाना रितसर शासनाने 1991 च्या जी आर नुसार जमीन नांव केली पाहिजे तसेच वन कायद्याप्रमाणे आदिवासी व भूमीहिनांसातबारा मिळाला पाहिजे तसेच शासनाच्या निर्णयानुसार भूमीहीन शेतमजुरांना जमीनीचे वाटप व बेघरांना जागा उपलब्ध करुन घरकुल बांधुन दिले पाहिजे राज्य शासनाने व केंद्र शासनान जन विरोधी धोरणे राबवुन भूमीहीन श्रमिक जनतेला न्याय न देता त्यांना जमीनीवरुन हुसकवण्याचा सततचा प्रयत्न केला जात आहे नंदुरबार जिल्हयात राज्य शासनाकडुन भूमीहीन बेघर लोकांसाठी पंतप्रधान आवास योजना व शबरी आवास योजनेचा कोटा डी.आर.डी. कडे आलेला नाही फक्त आदीवासी विकास प्रकल्प मार्फत किरकोळी आदिवासींना शबरी आवास योजनेचा लाभ दिला जात आहे पंरतु बिगर आदिवासी श्रमिक कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेमार्फत व रमाई आवास योजनेमार्फत घरकुल देणे अंत्यंत गरजेचे आहे. पंरतु महाराष्ट्र शासनाने या दोन्ही योजनेचा कोटा दिलेला नाही हा एकप्रकारे बिगर आदिवासी श्रमिक लोकांवरचा अन्यायच आहे व त्यांना अशा घरकुल योजनेपासुन वंचित ठेवण्याचे हे एक षडयंत्रच आहे.

महाराष्ट्र शासनाने वृश्दपकाळ योजनेची रक्कम 1000/- रु वरुन 1500/- देण्याचे जाहीर केले असतांना अद्याप पर्यंत त्याची अंमलबजावनी झालेली नाही याउलट दरमहा 1000/- रु मिळण्याऐवजी दोन-दोन, तीन-तीन महिने पेन्शन मिळकत नाही व सज्ञानमुले असण्यचा बहाणा करुन त्यांना पेन्शनपासुन वंचित ठेवण्याचा प्रकार चालु आहे. भूमीहीन शेतमजुर अल्प भुधारक व दारिद्रय रेषेखालील कुटुंबाना राज्य शासनाच्या स्वस्त धान्य दुकानामार्फत दरमहा 35 किलो धान्य देण्याऐवजी माणसी फक्त 5 किलो धान्य दिले जोते तेही वेळेवर मिळत नाही म्हणुन दारिद्रय रेषेखालील कटुंबांना दरमहा 35 किलो धान्य अंत्योदर योजनेमार्फत दिले गेले पाहिजे. 
यासह जनतेच्या प्रमुख मागण्या

प्रलंबित वनदावे ताबडतोब मंजुर करुन जमीनीचे वाटप करुन सातबारा देण्यात यावा. 

गायरान व पडिक जमीनी करणाऱ्यांच्या नांवे करा.
 गायरान व पडिक जमीनीवर घरे बांधलेल्या लोकांच्या नावे जागा करुन घरकुल योजना लागु करा.

 वृध्दपकाळ योजना, संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थ्यांना दरमहा 3000/- रु. पेन्शन अदा करा. तसेच विविध योजनेमधील सज्ञान मुलांची अट रद्द करण्यात यावी.

 भूमीहीन शेतमजुर व अल्प भूधारक कुटुंबांना दरमहा अंत्योदर योजने मार्फत 35 किलो धान्य अदा करा.

मोहिदे त.श. ते कहाटुळ रस्ता ताबडतोब दुरुस्त करण्यात यावा. मोहिदे त.श. चौफुली वर सिग्नल बसविण्यात यावे.

प्रलंबित अर्थ सहाय्यके थकबाकी त्वरीत अदा करावी.

शिधापत्रिका शासकीय कार्यालयातुन पुरविण्यात यावी.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी पंचनामे त्वरीत करुन भरपाई देण्यात यावी.

मजुरांचे स्थलांतर बंद करुन त्यांना स्थानिक रोजगार उपलब्ध करुन देण्यात यावे.

रोजगार हमीचे कामे ताबडताने चालू करा

कर्मवीर दादासाहेब सबड़ीकर यत्रिनेची अमेत बगावणी करा. 

दरा घरमा मध्ये बुडीन झालेल्या क्षेत्राची भरपाई त्वरीत अदा करा, कापसाला मोग्य हमी भाव द्या. आधी मागण्याचे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले यावेळी कॉम्रेड सुनील गायकवाड  नथ्थु साळवे, खंडू सामुद्रे, उत्तम पवार, लता ठाकरे, संतोष गायकवाड, राजाराम ठाकरे, नानू गिरासे, शरद पाटील  सतिलाल महिरे, दिनेश बागुल, दयानंद चव्हाण, सुनील गवळे, बलराम ढोडरे, आदितसह शेकडो महिला या मोर्च्यात सहभागी झाले होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने