श्री.खंडेराव महाराज मंदीरात चंपाषष्ठी उत्सव सोहळानिमित्त संत भजनी मंडळींचे संत भजन उत्साहात संपन्न*




श्री.खंडेराव महाराज मंदीरात चंपाषष्ठी उत्सव सोहळानिमित्त संत भजनी मंडळींचे संत भजन उत्साहात संपन्न*     

                                शिरपुर— श्री.खंडेराव महाराज मंदीरात सालाबादा प्रमाणे मार्गशीर्ष मासारंभ देव दीपावली चंपाषष्ठी मार्तडभैरवोत्थापन स्कंदषष्ठी सोहळानिमित्त   मार्तडभैरव षडरात्रोत्सवारंभ दि.१३ डिसेंबर ते दि.१८ डिसेंबर २०२३ पर्यंत संत भजन वारकरी,टाळकरी भजनी मंडळ धार्मिक वातावरणात श्री.खंडेराव महाराज मंदीर भजनी मंडळ आनंद साजरा करत असतात त्यात रात्री ९ वा. कलमाडी,होळ,कमखेडा भजनी मंडळी तसेच शिरपुर तालुक्यातील बाळदे,उंटावद,सावळदे,बाभुळदे,दहिवद,शिंगावे भजनी मंडळी तसेच शिरपुर शहरातील बालब्रम्हचारी,मठाधिपती,  गोरक्षक,महंत सतिषदास भोंगे महाराज,वृध्दकलावंत मानधन योजना धुळे जिल्हा समिती   सदस्य,भागवताचार्य ह.भ.प. प्रमोद भोंगे महाराज उपस्थित होते तसेच वरचेगाव रथगल्ली संत सावता माळी भजनी मंडळ,श्रीराम मंदीर भजनी मंडळ,संत सावता माळी भजनी मंडळ वरवाडे,जय विजयेश्वर भजनी मंडळ पाटीलवाडा,माऊली भजनी मंडळ करवंद नाका,श्री.साईनाथ मंदीर भजनी मंडळ मार्क्रेट यार्ड या सर्व भजनी मंडळींनी अभंग,भावगीत,  व गवळणींचा आनंद घेत भजनात रंगले जनु वारकरींचा मेळा होता जय हरी,जय मल्हार                                           आयोजक— श्री.खंडेराव बाबा विकास संस्था शिरपूर जि.धुळे ,श्री.खंडेराव मंदीर भक्त परिवार

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने