कोठली येथील ग्रामस्थांचे पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण*




*कोठली येथील ग्रामस्थांचे पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण*

-  कोठली ता.शहादा येथील ग्रामपंचायतीत तीन वर्षात प्राप्त झालेल्या शासननिधीच्या खर्चाची तसेच वसुली करण्यात आलेल्या घरपट्टी पाणीपट्टी रकमेतील अपहाराची चौकशी करून  सरपंच,ग्रामसेवक व सरपंचपुत्र असलेल्या ग्रा. प.सदस्यांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी कोठली येथील जिजाबराव यशवंत पाटील व अरुण भीमराव पाटील हे शहादा पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत.न्याय मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
    कोठली येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी प्रत्यक्षात तीन वर्षात एकही ग्रामसभा न घेता बेकायदेशिर निधी खर्च करणे,सरपंचपुत्र असलेल्या ग्रा.प सदस्याने जुन्या करवसुली पावत्याद्वारे स्वतःची स्वाक्षरी करून घरपट्टी पाणीपट्टी वसुली करणे,ग्रामपंचायतीच्या विविध बँक खात्यातून कुठलेही विकासकाम न करता गावातीलच खाजगी काम करणाऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यावर मोठमोठ्या शासकीय रक्कमा हस्तांतर करून अपहार करणे,माहिती अधिकारात माहिती मागितली असता माहिती न देणे असे विविध आरोप आहेत.सदर आरोपांची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी म्हणून आंदोनकर्त्यांनी एक महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी नंदुरबार व गटविकास अधिकारी शहादा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र  महिना उलटल्यानंतरही कारवाई झाली नाही म्हणून बेमुदत उपोषण करत असल्याचे उपोषणकर्ते जिजाबराव पाटील,अरुण पाटील यांनी सांगितले.उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी गावातील व परिसरातील असंख्य नागरिक भेट देत आहेत.तसेच अनेक पदाधिकारी उपोषणस्थळी भेट देऊन माहिती जाणून घेत आहेत. ग्रापंचायतींत झालेल्या भ्रष्ट्राचाराची चौकशी करून दोषीवर गुन्हे दाखल व्हावे म्हणून केल्या जाणाऱ्या उपोषणमार्गामुळे भ्रष्टाचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने